कॉलेज कट्टा

कॉलेज कट्टा

Published on

कॉलेज कट्टा

भारतीय संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार : डॉ. जितेंद्र होले
‘‘वेद, पुराणे आणि रामायण, महाभारतासारखे ग्रंथ यांच्यातून धर्म, समाज, विज्ञान, अध्यात्म यांचा समन्वय अधोरेखित होतो. नैतिकता, पर्यावरण संवर्धन, स्त्रीदाक्षिण्य, सामाजिक बांधिलकी आदींचे संस्करण होते. अठरा पुरणांमधील जीवनमूल्ये आणि तात्विक संकल्पना आजच्या युगातही दिशादर्शक ठरू शकतात. भारतीय परंपरा आणि संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार घडतात,’’ असे प्रतिपादन राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. जितेंद्र होले यांनी केले.
गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘‘महर्षी वेद व्यासरचित अठरा पुराण शास्र - संक्षिप्त परिचय’’ विषयावरील व्याख्यान देताना डॉ. होले बोलत होते. अरुणाचल प्रदेश येथील ‘एनआयटी’चे संचालक डॉ. आर. पी. शर्मा हे अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. संतोष भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. होले म्हणाले, ‘‘अठरा पुराणे ही वेदव्यासांनी रचलेली असून त्यातून सृष्टीनिर्मितीपासून मोक्षप्राप्तीपर्यंतचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास उलगडतो. भागवत पुराण हे भक्तीचा सर्वोच्च आदर्श ठरते. मार्कंडेयपुराणातील राधाकृष्ण चरित्र, अग्निपुराणातील स्थापत्यकला व नीतिशास्त्र अशा गोष्टी समजतात.’’ डॉ. शर्मा आणि डॉ. भोसले यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्व सांगत विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. पी. डी. पाटील यांनी, आभार डॉ. सुबिम खान यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. आशिष देवशेट्टे आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाने नियोजन केले.

डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे ‘जी-पॅट’ परीक्षेत यश
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसमार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट २०२५) या परीक्षेत आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याद्वारे स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.
फार्मसी शिक्षण क्षेत्राच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. या स्पर्धेमध्ये सत्यम राठोड या विद्यार्थ्याने देशामध्ये १९७ वा क्रमांक मिळवला आहे तसेच कौशल जाधव, रुचिका बोरकर, प्रियांका शर्मा, साक्षी चव्हाण, वैष्णवी दणके, जयदीप जेजुरकर, नियती पवार आणि गायत्री सोनवणे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या परीक्षेसाठी प्रा. डॉ. पवनकुमार वानखडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून सत्कार करण्यात आला. त्यासाठी सचिव प्रा. डॉ. शुभांगी दसवडकर यांनी पुढाकार घेतला.
तर, संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी अभिनंदन केले. संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com