संवाद माझा

संवाद माझा

Published on

उड्डाणपुलांचे विद्रुपीकरण थांबवा
एम्पायर इस्टेट येथील संत मदर टेरेसा उड्डाणपुलाच्या भिंतींवर अनेक विचित्र चित्रे काढून बकाल केल्या आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्ती फक्त याच उड्डाणपुलावर नाही; तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील पुलांचे विद्रूपीकरण करत आहे. महानगरपालिका रंगरंगोटी व सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च करते. परंतु अशा पद्धतीने सुंदर भिंती खराब केल्या जातात. हे प्रकार थांबवण्यासाठी महानगरपालिकेने रीतसर पोलिसांची मदत घेऊन अशा प्रकाराला त्वरित आळा घालावा.
- राजेश अग्रवाल, एम्पायर इस्टेट, चिंचवड
PNE25V31225

तुटके खेळण दुरुस्त करा
पिंपळे निलख येथे माजी महापौर कै. प्रभाकर साठे पाटील उद्यानामधील झोका व चार बदक असणारे लहान मुलांचे खेळणे तुटले आहे. तरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित खेळण्यांची दुरुस्ती करावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V31228

गलिच्छ ठिकाणी प्रवासी ताटकळत
शहरातील पीएमपी बसथांबे किंवा एसटी बसस्थानकांवर एकाही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था नाही. पुणे - मुंबई मार्गावरील हिंजवडी थांब्यावर अशा गलिच्छ ठिकाणी प्रवासी एसटी बसची वाट पाहात थांबतात.
- मोहन गद्रे, तळेगाव दाभाडे
PNE25V31226

फुटक्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
सुदर्शननगर, पिंपळे गुरवमधील गल्ली क्र. पाच समोरील जगताप पाटील पेट्रोल पंपाच्या रस्त्यावर येथील चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे. तरी मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करावी, ही नागरिकांकडून मागणी आहे.
- नाना देसले, पिंपळे गुरव
NE25V31227

अरुंद रस्त्यावर पार्किंगचे नियोजन
चिंचवड येथील एम्पायर स्क्वेअरपासून आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता अरुंद आहे. सायंकाळी तर रहदारीस अडचण होती. त्यावर आता वाहने उभी करणे आणि अथवा पदपथासाठी कामाची आखणी केली आहे.
- टी. सचिन, एम्पायर स्क्वेअर, चिंचवड
PNE25V31231

Marathi News Esakal
www.esakal.com