भूसंपादनासाठी स्वतंत्र टास्क फोर्स

भूसंपादनासाठी स्वतंत्र टास्क फोर्स

Published on

पिंपरी, ता. १४ ः शहरातील भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावेत. त्यासाठी भूसंपादन, भूमिअभिलेख, महापालिका आणि जागेशी संबंधित विभाग अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या विशेष टास्क फोर्सची स्थापना करावी. यामध्ये प्राधान्याने रस्त्यांच्या विषयांचा विचार करून आपसात समन्वय ठेऊन सर्व प्रकरणे पाच सप्टेंबरपर्यंत मार्गी लावावीत, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिला.
रस्त्यांसह विविध विकास प्रकल्पांसाठी महापालिकेला भूसंपादनाची आवश्यकता असते. मात्र, तांत्रिक बाबी व संबंधित विभागांतील समन्वयाअभावी काही प्रकरणे प्रलंबित राहतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते विकास आणि विविध विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक भूसंपादनाच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूमिअभिलेख उपअधीक्षक विकास गोफणे, पल्लवी पिंगळे, नगर भूमापन अधिकारी अमित ननावरे, प्रभारी भूसंपादन अधिकारी उषा विश्वासराव, योगेश देशपांडे आदी उपस्थित होते.

भूसंपादनासाठी कालबद्ध कार्यक्रम
- भूमापन आणि नकाशे तयार करणे
- मोजणी शुल्क भरून प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करणे
- प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही करणे

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले...
- भूसंपादन अधिकारी कार्यालयाला आवश्यक मनुष्यबळ आणि तत्सम सुविधा देण्यात कमतरता राहणार नाही
- भूसंपादनाशी संबंधित अधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करून समन्वय ठेवावा
- नगररचना विभागाने भूसंपादनाचे सर्व प्रलंबित विषय मुदतीत मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेऊन कामकाज पूर्ण करावे
- रस्ते विकासासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण होण्यासाठी नगररचना विभागाने जागा मालकांशी समन्वय साधावा
- टीडीआर अथवा एफएसआयच्या बदल्यात जागा हस्तांतरणासाठी भूसंपादन विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे
- भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेऊन, एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करावा

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले...
- वाकड, ताथवडे, पुनावळे भागांत मुंबई-बंगळूर महामार्गालगत सेवा रस्त्यासाठी जागेचे भूसंपादन करण्याचा विषय प्राधान्याने तत्काळ सोडवा
- मुळशी व हवेली भूमी अभिलेख; तसेच नगर भूमापन अधिकाऱ्यांनी कार्यवाहीच्या तारखा निश्चित करून ठरलेल्या दिवशी भूसंपादनाची आवश्यक प्रक्रिया एकत्रितपणे पूर्ण करावी
- महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक पूर्तता करावी
- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी दरमहा आढावा घेणार
- भूसंपादनातील अडचणी दूर करून जलद गतीने प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे

भूसंपादनाची प्रकरणे...
- चिखलीत देहू-आळंदी रस्ता
- पुनावळे मैलाशुद्धीकरण केंद्र व पोहोच रस्ता
- चिखली-तळवडे शिवेवरील १२ मीटर रुंद डीपी रस्ता
- वीर बाबा चौक ते मामुर्डी गावठाणापर्यंत १८ मीटर रुंद रस्ता
- चोविसावाडीतील प्रस्तावित ९० मीटर रुंद रस्ता
- पुणे-आळंदी मार्गावर दिघीत ६० मीटर रुंदीकरण रस्ता
- बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, मोशीत इंद्रायणी नदी लगत १८ मीटर रुंद
रस्ता
- तळवडे कॅनबे चौक ते निगडीस स्पाईन रस्ता जोडणारा १८ मीटर रुंद रस्ता
- तळवडे इंद्रायणी नदीलगत १२ व ३० मीटर रुंद रस्ता
- किवळेत रावेत हद्द ते देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीपर्यंत बाह्यवळण मार्गालगत १२ मीटर रुंद सेवा रस्ते
- मोशी बोऱ्हाडेवाडीत पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी शीव ते इंद्रायणी नदीपर्यंत ६० मीटर रुंद रस्ता
- ताथवडेत बाह्यवळण मार्गालगत १२ मीटर रुंद सेवा रस्ते
- दिघीत १२ व १५ मीटर रुंद डीपी रस्ता
- रहाटणीत १८ मीटर रुंद डीपी रस्ता
- चऱ्होलीत ४५ मीटर रुंद डीपी रस्ता
- रहाटणीत १२ मीटर डीपी रस्ता (प्राथमिक शाळा ते काळेवाडी ४५ मीटर रुंद)
- देहू-तळवडे १८ मीटर रुंद
- वाकड ३६ मीटर रस्ता आणि २४ व ३० मीटर रुंद रस्ता
- चऱ्होलीत १८ मीटर रुंद रस्ता
- भोसरी ६१ मीटर रुंद रस्ता
- चिखली वडाचा मळा ते देहू-आळंदीपर्यंत ३० मीटर रस्ता
- चिखली जलशुद्धीकरण केंद्रापासून इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयापर्यंत १८ मीटर रस्ता
- इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयापासून देहू-आळंदी रस्त्यापर्यंतचा १२ मीटर रुंद रस्ता
- पुनावळे, रावेत व वाकड येथील बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवा रस्ता
- चऱ्होलीत गुरांचा पाणवठा
- चिखलीत इंद्रायणी नदीलगत १८ मीटर रुंद रस्ता
- चिखली चौक ते सोनवणे वस्तीकडे तळवडे हद्दीपर्यंत रस्ता
- सांगवीत नदी कडेचा १८ मीटर रुंद रस्ता
- पिंपळे गुरवमध्ये खेळाचे मैदान
- ताथवडे दफनभूमी जवळून जाणारा १२ मीटर रुंद पोहोच रस्ता
- दिघी अग्निशमन केंद्र आणि खेळाचे मैदान
- सांगवीत नदीकडेच्या पूर्व-पश्चिम विकास योजनेतील १२ मीटर रुंद रस्ता
- वडमुखवाडीत १८ मीटर रुंद रस्ता
- चऱ्होलीत ३० मीटर रुंद रस्ता

‘‘प्रलंबित विकासकामे व रस्त्यांसाठी भूसंपादन गतीने होण्यासाठी संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी आपसांत समन्वय ठेऊन नियोजित केलेल्या तारखेस कामकाजाची पूर्तता करावी. भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहावे. पाच सप्टेंबरपर्यंत भूसंपादनासंबंधित सर्व प्रलंबित विषय मार्गी लावावा.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

‘‘महापालिकेच्या हद्दीतील रस्ते आणि इतर विकास प्रकल्प राबविण्यासाठी भूसंपादन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये रस्ते विकासाला प्राधान्य देऊन शहर वाहतूककोंडी मुक्त करण्याचा प्रयत्न आहे. संबंधित जागा मालकांनी विकास कामाच्या आवश्यक भूसंपादन प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com