हजारो युवकांनी घेतले व्यावसायीक प्रशिक्षण
''कौशल्यम-लाईटहाउस'' युवकांच्या पंखांना बळ
हजारो युवकांनी घेतले व्यावसायीक प्रशिक्षण
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रकल्प लाभदायक
पिंपरी, ता. १४ ः पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ''कौशल्यम-लाईटहाउस - कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र'' या अभिनव उपक्रमाने शहरातील शेकडो युवक-युवतींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, दापोडी, आकुर्डी, किवळे, नेहरूनगर, बोपखेल, बोऱ्हाडेवाडी आणि चिखली या ठिकाणी एकूण ११ लाईटहाउस केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये आतापर्यंत ९ हजार २३० पेक्षा अधिक युवकांनी फाउंडेशन कोर्स पूर्ण केले आहेत. त्यापैकी २ हजार २१७ युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यापैकी काहींनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. तर, ४ हजार २३६ पेक्षा अधिक युवकांना बिग बास्केट, एअरटेल, टाटा मोटर्स, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, अमेझॉन, एजिओ फार्मा यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
------चौकट १
ट्रान्सजेंडर आणि दव्यांगांना संधी
लाईटहाऊसमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवासाची सुरुवात २२ दिवसांच्या फाउंडेशन कोर्सने केली जाते. या कोर्समध्ये स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि डिजिटल साक्षरता यांसारख्या मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनाही त्यांच्या क्षमतेनुसार रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून तेही समाजात आत्मनिर्भरपणे उभे राहू शकतील. याशिवाय, जावा, डेटा अनॅलिसिस यांसारख्या उच्च दर्जाच्या कोर्सेससाठी लाईटहाऊसने खासगी प्रशिक्षण संस्थांशी टायअप केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना हे कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या संस्थांमध्ये पाठवले जाते, आणि प्रशिक्षणाचे शुल्क लाईटहाऊसमार्फत भरले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्ससाठी स्वतंत्रपणे पैसे भरावे लागत नाहीत.
------चौकट २
कोर्स निवडण्यापूर्वी करिअर टेस्ट
लाईट हाऊस मधील प्रत्येक युवकाच्या प्रवासाची सुरुवात १०० तासांच्या फाउंडेशन कोर्सने होते. या टप्प्यावर संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता, गटकार्य आणि आत्मचिंतन यांसारख्या मूलभूत गोष्टींवर भर दिला जातो. यानंतर त्यांची करिअर टेस्ट आणि समुपदेशनाद्वारे त्यांच्या आवडीप्रमाणे योग्य कोर्सची निवड केली जाते.
------चौकट ३
उद्योगाभिमुख कोर्सेस शिकवण्यावर भर
केंद्रामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सीएनसी ऑपरेटर, नर्सिंग असिस्टंट, डिजिटल मार्केटिंग, फिटनेस व न्यूट्रिशन, लॉजिस्टिक्स, ग्राफिक डिझायनिंग, एसी व फ्रिज रिपेअरिंग, डेटा अॅनालिस्ट, पीएलसी प्रोग्रॅमिंग यांसारखे आधुनिक आणि उद्योगाभिमुख कोर्सेस शिकवले जातात. युवकांमध्ये संगणक साक्षरता आणण्यासाठी विविध संगणकीय कोर्सेस शिकवले जातात.
-----पॉईंटर १
लाईटहाऊसची वैशिष्ट्ये
प्रकल्पाचा आधार ः सीएसआर फंडातून राबवला जातो
कोर्स फी ः सर्व कोर्सेस मोफत उपलब्ध
कोर्स कालावधी ः किमान २ महिने ते जास्तीत जास्त ६ महिने
कोर्सची संख्या ः ४० पेक्षा अधिक कौशल्य विकास कोर्सेस
प्रमाणपत्र ः प्रत्येक कोर्सनंतर अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते
शैक्षणिक पात्रता ः दहावी नापास ते पदवीधर सर्वांना संधी
वयाची मर्यादा ः १८ ते ३५ वर्षे वयोगटासाठी
-----पॉईंटर २
शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे
नोकरीची सुविधा ः प्रशिक्षणानंतर थेट प्लेसमेंट
सहकारी कंपन्या ः १०० पेक्षा जास्त कंपन्यांसोबत टायअप
प्रमुख कोर्सेस ः जावा, ब्युटी पार्लर, डेटा ॲनॅलिसिस, डिजिटल मार्केटिंग, एसी रिपेअर, सीएनसी ऑपरेटर आदी
कौशल्य आधारित शिकवण ः विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पातळीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण
उद्योजकतेला चालना ः काही विद्यार्थी स्वतःचे व्यवसाय सुरू करून यशस्वी
व्यक्तिमत्त्व विकास ः प्रत्येक प्रशिक्षणक्रमात संवादकौशल्य, टीमवर्क, नेतृत्व, प्रोफेशनल वर्तन यावर भर
------कोट
कौशल्यम-लाईटहाउस प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ प्रशिक्षण नव्हेच, तर युवकांच्या स्वप्नांना दिशा दिली जाते. पिंपरी-चिंचवड शहर बेरोजगारविरोधी आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जात आहे. जास्तीत जास्त युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
- अमृता बाहुलेकर, प्रोग्रॅम हेड, लाईट हाऊस
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.