संवाद माझा

संवाद माझा

Published on

डांबरी रस्ता खोदून वृक्षारोपण
डांबरी रस्ता खोदून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. दळवीनगर ते चिंचवडगाव रस्त्यावर टाटा मोटर्सच्या भिंतीशेजारी टाटा मोटर्स कंपनीने ही जागा पार्किंग व वाहतुकीसाठी दिलेली आहे. त्याखाली दगडी थर आहे. अशा जमिनीत झाडे कसे उगवणार, हा मोठा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे पदपथाखाली मुख्य रस्त्यावर यासाठी खड्डे घेण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ताही काही प्रमाणात अरुंद झाला आहे.
- रुपेश बाळकृष्ण धनवे, दळवीनगर, चिंचवड
PNE25V31572

तळवडे चौकात सिग्नलसमोर अडथळे
तळवडे गावातील मुख्य चौकात सिग्नलसमोर झाडांची फांदी वाढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. या झाडामुळे सिग्नल स्पष्टपणे दिसत नसल्याने ग्रामस्थ, कामगार तसेच प्रवासी वाहनचालक यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळवडे गावातून चौकात येणाऱ्यांना सिग्नल ग्रीन होण्याचा कालावधी केवळ ११ सेकंदांचा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याचा धोका वाढत आहे. या सिग्नलचा कालावधी वाढवावा. तसेच झाडांची छाटणी करावी, अशी मागणी तळवडे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
- सचिन कुडापणे, तळवडे
PNE25V31562

निगडी-आकुर्डी रस्त्याची चाळण
निगडीतील टिळक चौकाजवळील सावली हॉटेलपासून ते सेंट उर्सूला हायस्कूल आणि पुढे आकुर्डी गावाकडे जाणाऱ्या वळणापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. वर्षभरापूर्वी या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता. रस्ता वाहतुकीसाठी योग्य होता. पण, नंतर वेळोवेळी काही कामांसाठी तो खोदला गेला आणि नंतर त्याची पुरती वाताहत झाली आहे. कितीही विकास केला, प्रगती झाली तरीही कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीचे तंत्रज्ञान भारतात येणे अशक्य आहे. रस्ता तयार करतांना शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये काही समन्वय असणे आवश्यक आहे.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE25V31569

साचणाऱ्या पाण्यामुळे अस्वच्छता
शाहूनगर, शिव शंभो मंदिर येथे ‘टी जंक्शन’ आहे. तेथे रस्त्याच्या एका बाजूला पावसाचे पाणी साचते. पाणी कमी झाल्यानंतर तेथे चिखल राहतो. सदर रस्ता नियमाप्रमाणे नाही. त्याच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी येथील समस्या कायमस्वरुपी सोडवावी, अशी आमची मागणी आहे.
- देवेंद्र मेहता, शाहूनगर एमआयडीसी, चिंचवड.
PNE25V31571

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com