
पिंपरी, ता. १५ महापालिकेची परवानगी न घेता थेरगाव व रहाटणी येथे सुरू असलेल्या बांधकामांवर प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली. यामध्ये थेरगाव येथील गुजरनगर, लक्ष्मणनगर आणि रहाटणी गावठाणातील १३ हजार ३१५ चौरस फुटांवरील आठ बांधकामे पाडण्यात आली.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी किशोर ननावरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. याबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘शहराचा शाश्वत विकास करणे व नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे.’’