दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी व्यापक मोहीम

दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी व्यापक मोहीम

Published on

पिंपरी, ता. १५ : शहरातील दिव्यांग नागरिकांची अचूक नोंद घेण्यासाठी महापालिका आणि दिव्यांग भवन व्यापक सर्वेक्षण करणार आहे. त्यातून दिव्यांगांची नेमकी संख्या, त्यांच्या अडचणी, गरजा आणि लाभार्थी योजनांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने स्थानिक स्तरावर दर पाच वर्षांनी दिव्यांगांचा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. २०१६ च्या कायद्यानुसार २१ प्रकारचे दिव्यांगत्व निदर्शनास आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेने सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून दिव्यांगांविषयी सखोल माहिती गोळा केली जाणार आहे. सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून अचूक माहिती संकलनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका समाज विकास विभागाने केले आहे.

ऑनलाइन-ऑफलाइन सर्वेक्षण
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी महिला बचत गट, आशा सेविका आणि दिव्यांग बांधवांची मदत घेण्यात येणार आहे. हा सर्वेक्षण ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन माहिती संकनासाठी ॲपचा वापर केला जाणार आहे.

दिव्यांगांच्या सर्वेक्षणाची उद्दिष्टे
- दिव्यांगत्वाचे प्रकार जाणून घेणे
- योजना व सेवांची माहिती संग्रहित करणे
- व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थिती समजून घेणे
- कौशल्य व रोजगार कौशल्यातील तफावत समजून घेणे
- प्रशिक्षण देणे व योजनांची आखणी करणे
- दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनून देशाच्या अर्थचक्रात योगदानासाठी प्रोत्साहित करणे
- योजना व सेवांव्यतिरिक्त इतर आवश्यक विकास गोष्टी जाणून घेणे
- संभाव्य दिव्यांगत्व टाळण्यासाठी उपाययोजना करणे
- दिव्यांगांना हक्कांची जाणीव करून देणे व त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासन यंत्रणा सक्षम करणे
- अर्भकांमध्ये दिव्यांगत्व आढळल्यास पालकांना उपचारांसाठी माहिती देणे
- बेरोजगार किंवा कुशल दिव्यांग तरुण, स्त्रिया, महिला, पुरुषांना रोजगार किंवा स्व-रोजगारसाठी मार्गदर्शन करणे, रोजगारासाठी अनुकूल उपाययोजनांची आखणी करणे
- ज्येष्ठ दिव्यांगांच्या समस्या समजून घेणे, त्यांची सद्यःस्थिती पाहणे, मदतीची आवश्यकता जाणून घेणे, मदत उपाययोजनांचा आराखडा तयार करणे

दिव्यांग व्यक्तींसाठी प्रभावी योजना राबवण्यासाठी आधी त्यांची अचूक माहिती संकलित असणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर आधारित शहरातील दिव्यांगांसाठी सुविधा आणि योजना अधिक सक्षम करता येणार आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

दिव्यांगांना मुख्य व सामाजिक-आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. केंद्र व राज्य सरकारसह महापालिकेच्या योजना जास्तीतजास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वेक्षणाची मदत होईल.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com