गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

नोकरीचे आमिष दाखवून साडेतेरा लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. १५ : मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १३ लाख ५० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. दिघी येथील समर्थनगर परिसरात हा प्रकार घडला.
याप्रकरणी मुलाच्‍या वडिलांनी दिघी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून धनंजय कारखानीस, नूतन कारखानीस, रोहित कारखानीस आणि तुषार कारखानीस यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला. एका आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून त्यांचा मुलगा सूरज जाधव याला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्‍यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश व रोख स्वरूपात १३ लाख ५० हजार रुपये घेण्यात आले, मात्र नोकरी लावण्यात आली नाही. याशिवाय फिर्यादीला जिवे मारण्‍याची धमकी देण्यात आली.
---------------------

पावणे दोन कोटींची फसवणूक
कंपनी स्थापन करून पाच टक्के नफा व वन बीएचके सदनिका मिळेल, असे सांगून अनेक गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ८६ लाख ८२ हजार ६०० रुपयांना फसवणूक कण्यात आली. हा प्रकार मोशी येथे घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्‍या एका नागरिकाने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून प्रशांत राधाकृष्ण होन (वय ३२, रा. अहिल्यानगर), बाळासाहेब सखाराम चौरे (वय ३०, रा. केज, जि. बीड), नीलेश अनिलराव काळे (वय २९, रा. देहू), ऋतुराज देविदास कातकडे (वय २८, रा. अंबाजोगाई, बीड) व शिरीष ढेंबरे (वय ३०, रा. धाराशिव) यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आहे.
आरोपींनी संगनमत करून ‘ब्रिक्स सोल्यूशन या नावाने कंपनी स्थापन केली. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना बांधकाम प्रकल्पात सदनिका मिळेल तसेच पाच टक्‍के नफा दिला जाईल, असे आश्‍वासन देण्यात आली. फिर्यादी व इतरांकडून एक कोटी ८६ लाख ८२ हजार ६०० रुपये घेण्यात आले, मात्र कोणताही मोबदला न देता आरोपींनी फसवणूक केली.
-------------------
पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई कासारवाडी रेल्‍वे स्थानकाजवळ करण्यात आली. साहिल अशोक रजपूत (वय २५, रा. मंगळवार पेठ, गाडीतळ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. एक जण कासारवाडी रेल्‍वे स्थानकाजवळ संशयास्पद पद्धतीने फिरत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार संशयावरून साहिलला ताब्‍यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्‍याच्‍याजवळ ५१ हजार रुपयांचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले.
-----------------
प्लॉटच्या नावाखाली फसवणूक
एन. ए. प्लॉटच्या नावाखाली बनावट कागदपत्रांद्वारे सुमारे १७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. हा प्रकार घटना लवळे व भुकूम येथे घडला. या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. सुजित तुकाराम गवारे (वय ३७, रा. सॉंगबर्ड सोसायटी, भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे) असे नाव आहे. आरोपीने आपण रिद्धी-सिद्धी आकाशगंगा गृहनिर्माण संस्थेचा प्रवर्तक आणि संचालक असल्‍याचे सांगितले. थाउजंड कीज नावाच्या कंपनीच्या नावे एन. ए. प्लॉट विकणे आहे, अशी खोटी जाहिरात त्याने केली. आपण ९० एकर जागा विकसित करीत असल्याची बतावणी त्याने केली. फिर्यादीला इ-३ प्लॉट त्याच्या मालकीचा असल्याचे सांगून आरोपीने बनावट कागदपत्रे दाखवली. समजुतीचा करारनामा बनवून ५७ लाख २० हजार रुपयांना व्यवहार ठरवला. या व्यवहारापोटी फिर्यादीकडून वेळोवेळी १७ लाख ८० हजार रुपये घेण्यात आले. तसेच खरेदीखत करण्यास टाळाटाळ करून फिर्यादीचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली.
-------------

वाहनाच्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू
भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्‍वार तरुणाचा मृत्‍यू झाला. ही दुर्घटना वाकड येथे घडली. प्रसाद महावीर म्‍हाकाळे (वय ३५, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव, पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील महावीर मारुती म्‍हाकाळे यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी
अज्ञात वाहनचालकावर गुन्‍हा दाखल केला. प्रसाद औंधकडून जगताप डेअरीकडे जात होते. वाकड फाटा बसथांब्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी आल्याने प्रसाद यांचा मृत्‍यू झाला.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com