‘पीएमआरडीए’च्या विभागाला खडबडून जाग

‘पीएमआरडीए’च्या विभागाला खडबडून जाग

Published on

प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : अनधिकृत बांधकामांमुळे हिंजवडीसह वाकड, रावेत, पुनावळे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्‍या राज्‍य पातळीवर गाजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे अशा सर्वोच्च पातळीवर दखल घेण्यात आल्याने ‘पीएमआरडीए’चा अनधिकृत बांधकाम विभाग खडबडून जागा झाला.
यंदा सात महिन्यांत तब्बल साडेचार हजार अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग खडबडून जागा होण्यास आयुक्‍त डॉ. योगेश म्‍हसे यांच्या कडक सूचना महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर कारवाईला वेग आला. मागील वर्षाच्‍या तुलनेत कारवाईत विलक्षण वाढ झाल्‍याचे या विभागाच्या आकडेवारीवरून स्‍पष्ट होते.
पावसाचे प्रमाण वाढल्‍यास रस्‍त्‍यावर साचणारे पाणी आणि सकाळी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीमधील आयटी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक त्रस्‍त झाले आहेत. ही समस्‍या निर्माण होण्याची कारणे शोधण्याच्‍या सूचना उच्च पातळीवरून देण्यात आल्‍या. त्‍यानुसार ‘पीएमआरडीए’च्या पाहणीत वाढलेली अनधिकृत बांधकामेच समस्येचे मूळ असल्याचे निदर्शनास आले.
त्‍यानुसार नाल्‍यांवरील अतिक्रमणांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. आधी या विभागाची कारवाई संथ होती. गेल्‍या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत १७३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या वर्षात जानेवारीपासून दहा जुलैपर्यंत चार हजार ७०० अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. यावरून हा आकडा तब्बल चार हजार २५७ने वाढल्याचे स्‍पष्ट होते.
---

कार्यवाही कूर्मगतीने

विकसकांनी बांधलेल्‍या अनधिकृत बांधकामांना ‘पीएमआरडीए’च्‍या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून नोटिसा बजावल्‍या जातात. त्‍यानंतर परवानगीसाठी विकसकांची धावपळ होते. त्यासाठी प्रकरणे दाखल केली जातात. त्यावरील कार्यवाही मात्र कूर्मगतीने होते. संबंधित विकसकांनी रीतसर परवानगी घेतली का, याची शहानिशा होत नाही. परिणामी अशी अनधिकृत बांधकामे तशीच उभी राहतात. प्रकरणे दाखल झाल्‍यानंतर कार्यवाहीला वेग केव्हा येणार, असा प्रश्‍नही उपस्‍थित होतो आहे.
---

कारवाईचा तपशील

वर्ष ः बजावलेल्‍या नोटिसा ः कारवाई
२०२४ ः ३३८ ः १७३
२०२५ ः ३४६ ः ४,७००
---

शासनाच्‍या नियमानुसार अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्‍यानुसार कारवाईला गती मिळाली आहे. नागरिकांनीही प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन बांधकामे करावीत.
- डॉ. योगेश म्‍हसे, आयुक्‍त, ‘पीएमआरडीए’
-----

फोटो
31958
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com