हिंजवडीत कामासाठी ‘एमआयडीसी’ अखेर मुहूर्त

हिंजवडीत कामासाठी ‘एमआयडीसी’ अखेर मुहूर्त

Published on

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः हिंजवडीतील जलकोंडीला महिना उलटल्यानंतर नालेसफाईसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला अखेर मुहूर्त मिळाला. दहा जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरील बैठकीनंतर एमआयडीसीची यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आयटी पार्कमध्ये दिसत आहे.
नाल्यांवर बांधण्यात आलेल्या बांधकामांची परवानगीही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. हिंजवडीत मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे दोन ते तीन वेळा बहुतांश भागात पाणी साचले. यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. त्यानंतर ‘पीएमआरडीए’, ‘एमआयडीसी’ व सार्वजनिक बांधकाम यांच्या बैठकाही झाल्या. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती. अखेर मुख्यमंत्र्यांनी प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्याचा आदेश दिल्यानंतर नालेसफाई सुरु झाली.

‘एमआयडीसी’ करणार देखभाल

भुयारी गटारे साफ करणे, बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले सुरु करणे, नाल्यांवर बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावणे, अतिक्रमणे काढणे अशी मोहीम ‘एमआयडीसी’ने हाती घेतली आहेत. रखडलेली कामे पूर्ण झाल्यानंतरही ‘एमआयडीसी’ वर्षभर देखभाल-दुरुस्तीची कामे करणार आहे. यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ, उपकरणे व यंत्रणा उभारण्यासाठी अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली. मात्र, हीच पावले आधीच उचलली गेली असती तर जलकोंडीचे संकट उद्भवले नसते, अशी प्रतिक्रिया आयटी अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.
---
हिंजवडी परीसरातील बुजलेल्या भुयारी गटारांची सफाई हाती घेण्यात आली आहे. ज्यांनी नैसर्गिक ओढ्यांवर अतिक्रमणे केली आहेत, अशा बांधकामाच्या परवानग्या रद्द करण्यात येत आहेत. नालेसफाई, अतिक्रमण हटविणे व देखभाल-दुरुस्तीची प्रक्रिया वर्षभर सुरू राहील.
- नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ
---
गेल्या आठवड्यापासून हिंजवडीत ‘एमआयडीसी’ने विविध कामे हाती घेतली आहेत. आम्ही ज्या ठिकाणांबाबत समस्या मांडल्या तेथील अतिक्रमण काढणे, सांडपाणी वाहिन्या साफ करणे, ही कामे केली जात आहेत. वास्तविक हे काम आधीच होणे गरजेचे होते. मात्र आता प्रशासकीय यंत्रणांनी उचललेले पाऊल नक्कीच सकारात्मक आहे.
- पवनजीत माने, अध्यक्ष, एफआयटीई
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com