संवाद माझा
ऑक्सिजन पार्कला नाव द्या
पुनावळेतील विष्णुदेवनगर येथे ऑक्सिजन पार्क आहे. परंतु चार वर्षे झाली. त्याला कुठलेही नाव नाही. उद्यानाला नाव असणे आवश्यक आहे, असे वाटते.
कमलाकर कुलकर्णी पुनावळे
PNE25V32051
सिग्नलच्या वेळा ठरवा
शहरातील सर्व सिग्नल सर्वप्रथम चालू करावेत. सर्व सिग्नल आणि त्यावरील टायमर विना बिघाड चालतील, याची खात्री प्रशासनाने करावी. काही चौकात कॅमेऱ्याचा खांब सिग्नलच्या पुढे लावल्यामुळे सिग्नल व्यवस्थित दिसतच नाही. सिग्नलला दिलेला वेळ आणि तिथे असलेली वाहतूक याचा अभ्यास करून तेथील वेळ बदलावी. चौकामध्ये सिग्नल आणि कॅमेऱ्याचे खांब कुठे लावावेत ? याचे साधे धोरण प्रशासनाला करता आलेले दिसत नाही. मूळ गोष्टींतच अडचण आहे; तर स्मार्ट सिटी कशी बनवणार? हा प्रश्नच आहे.
- शरद एस. पिंपरी
25V32052
गटाराचे झाकण बसवा
कस्पटे चौक ते जगताप चौकातील गटार आणि त्याचे झाकण व्यवस्थित करण्यात यावे. त्याने पादचाऱ्यांच्या अपघाताचा धोका आहे. झाकण नीट बसविल्यास चालणे सोयीचे होईल.
- अशोक लालगुणकर, वाकड
PNE25V32050
सिग्नल चालू करावा
नवीन ऑटो क्लस्टरजवळील चौकामधील सिग्नल सात दिवसांपासून बंद आहे. कृपया तो चालू करावा. त्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
- श्याम मेमाणे, शाहूनगर
PNE25V32056
साई चौकात नामफलक बसवा
सांगवी - किवळे बीआरटीएस बस मार्गावरील साई चौक जगताप डेअरी, रहाटणी, पिंपळे सौदागरच्या शिवेवर आहे. या चौकात उड्डाणपूल आहे. त्याला अजूनपर्यंत काही नाव दिलेले नाही. तसेच चौकाचा नामफलकही महापालिकेने कुठेही लावलेला नाही. त्यामुळे चौकात नव्याने येणाऱ्यांना नागरिकांची गैरसोय होत असल्याने ‘साई चौक, जगताप डेअरी, साई चौक, रहाटणी - पिंपळे सौदागर अशा प्रकाराचे मोठे फलक बसविले जावेत.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V32049
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.