प्रारुप विकास आराखडा रद्द; शेतकऱ्यांत आनंद
सोमाटणे, ता. १७ : ‘पीएमआरडीए’चा प्रारुप विकास आराखडा (डीपी) उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील शेतकऱ्यांनी उर्से टोलनाका येथे एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सवात सहभाग घेतला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत दोन्ही बाजूंनी तीस मीटर रुंदीचा सेवा रस्ता करण्याचा प्रारुप आराखडा तयार केला होता. यामुळे गहुंजे ते लोणावळा मार्गालगत शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित होऊन अनेकजन भूमिहीन होणार होते. यापूर्वी शेतकऱ्यांनी द्रुतगती मार्ग, पवना, मळवंडी, आढले, पुसाणे,
कासारसाई आदी धरणांसाठी, क्रिकेट स्टेडियम, एमआयडीसीसाठी जमिनी दिल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन अजूनही झालेले नसताना आणखी जमिनी संपादित करण्याचा घाट या आराखड्याद्वारे घालण्यात आला होता. त्याद्वारे रस्त्या रुंदीकरणात जमीन जाऊन शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मावळ तालुका शेतकरी कृती समिती, भाजप किसान मोर्चा मावळ तालुका, शेतकरी यांच्या वतीने प्रकल्पास विरोध करत अनेक वेळा निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती.
तसेच माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्यासह नऊ जणांनी दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, जमीन हक्क परिषेदेचे अध्यक्ष माउली सोनवणे, दिनकर शेटे, गुलाबराव घारे, बाळासाहेब कारके, संदीप आंबेकर, जालिंदर सावंत, विकास धामणकर, करण कंधारे यांच्यासह शेतकऱ्यांनी द्रुतगती मार्गालगतच्या उर्से टोलनाका येथे आनंदोत्सव साजरा केला.
उर्से टोलनाका : सेवा रस्ता रद्द झाल्याने आनंदोत्सवात सहभागी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी.
smt17sf1,2.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.