गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

पोलिस असल्याची बतावणी करून
महिलेच्या दागिन्यांची फसवणूक

पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून एका महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केली. ही घटना बावधन येथील सिद्धार्थनगर येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या बावधन येथील डी पॅलेस चौक येथून पायी घरी जात असताना, सिद्धार्थ नगर तरुण मंडळ वाचनालयासमोर उभ्या असलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी त्यांना थांबवले. त्यानंतर मागून आलेल्या तिसऱ्या अनोळखी पुरुषाने ‘मी पोलिस इन्स्पेक्टर आहे, तुम्ही मंगळसूत्र घालू नका, आता बऱ्याच चोऱ्या करणाऱ्या टोळ्या आल्या आहेत,’ असे सांगितले. त्यांनी फिर्यादीचे एक लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून पर्समध्ये न ठेवता हातचलाखीने काढून घेतले व फसवणूक केली.

गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदा गुटखा, तंबाखू आणि पानमसाला विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई थरमॅक्स चौकाजवळ करण्यात आली. फरदिन फिरोज शेख (वय २०, रा. गल्ली क्रमांक, दोन, शरदनगर, चिखली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख याने त्याच्या टपरीत २३ हजार ४८० रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपन्यांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला व सिगारेट पाकिटे स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरीत्या खरेदी करून विक्रीसाठी ठेवली. दरम्यान पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

जुगारप्रकरणी सात जणांवर कारवाई
पिंपरी : इलेक्ट्रॉनिक मशिनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळणाऱ्यांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई भोसरीतील पीएमटी चौक येथील ओम साई लॉटरी येथे करण्यात आली. अमन राजकुमार कोहली (वय ३२, रा. आकुर्डी), केतन दिलीप घाडगे (वय ३२, रा. धावडे वस्ती भोसरी), जुगार खेळणारे बसवेश्वर सभांप्पा देवकर (वय ५२, रा. महादेव नगर, भोसरी), अमोल अभिमन्यू शिंदे (वय ३८, रा. गवळी नगर, भोसरी), गुलाब रफिक शेख (वय २५, रा. बालाजी नगर, भोसरी), करण भीमाशंकर कांबळे (वय ३४, रा. आदेश नगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे आरोपी इलेक्ट्रॉनिक मशिनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळत होते. या जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com