अण्णा भाऊ साठे यांना
महापालिकेचे अभिवादन

अण्णा भाऊ साठे यांना महापालिकेचे अभिवादन

Published on

पिंपरी, ता. १८ ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण केला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील पुतळ्यास उपायुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण केला. महापालिकेतील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, माजी अध्यक्ष नाना कसबे, सुनील भिसे, अरुण जोगदंड, संजय ससाणे उपस्थित होते.
निगडीतील कार्यक्रमास माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता शिवराज वायकर आदी उपस्थित होते. निगडीत शाहीर बापू पवार यांचा ‘भारतभूषण अण्णाभाऊला- वंदन माझे लोकशाहीराला’, ‘विजला ज्ञानाचा दिवा’, ‘साज साहित्याचा रुसला, १८ जुलै दिना - माझी मैना जवळ रडते, जरा बोला की आण्णा’ अशा गीतांनी अभिवादन करण्यात आले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com