संवाद माझा म

संवाद माझा म

Published on

वाहतुकीच्या सूचनांसाठी ॲप हवे
पिंपरीच्या मोरवाडी भागात म्हाडाकडे जाण्याचा रस्ता व सुखवानी क्लासिक सोसायटीच्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला महापालिकेच्या वाहतूक विभागाने ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीच्या रहिवाशांची खूप गैरसोय होत आहे. दोन्ही बाजूला ‘नो पार्किंग’ हे रहिवासी भागात कसे शक्य आहे ? ही वाहतूक विभागाची चूक त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. नागरिकांच्या चुकांसाठी आता ॲप बनले आहे; तसे वाहतूक विभागाच्या अशा चुकांसाठी सुद्धा तसेच वाहतुकीला अडथळा होणाऱ्या गोष्टींसाठी सुद्धा ॲप असावे. तातडीने याबाबत महानगरपालिकेने कारवाई करायला हवी.
- शिरीष गांधी

PNE25V32644

चेंबरचे झाकण उघडे
चिंचवडगावातील केशवनगर शाळेजवळ चेंबर बऱ्याच दिवसांपासून उघडे पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिकेने त्वरित दखल घेऊन चेंबरचे झाकण बसविण्याची व्यवस्था करावी.
- रमेश देव, चिंचवडगाव
PNE25V32649


भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा
पिंपरी येथील जिजाऊ सांस्कृतिक भवनाच्या लॉबीत सुरक्षा रक्षकासमोर सर्रास भटक्या श्वानांचा वावर आहे. दोन वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक थेट आयुक्त स्तरावर प्रयत्न प्रयत्न करत आहे. पण या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. विशेष म्हणजे या भवनात ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, शासकीय कार्यालय, महिला व पुरुषांचे जिम असून दिवसभर नागरिकांचा वावर असतो.
- निशिकांत कुलकर्णी, संत तुकारामनगर
PNE25V32651

वाहतूक कोंडीकडे लक्ष द्या
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यासाठी भूमकर वस्ती चौकातील एनफिल्ड शोरूमजवळील चौकात अनेकदा तीन पोलिस उभे असतात. त्याचवेळी पुणे - बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे.
- जयश्री वर्तक, ताथवडे
PNE25V32645


पेव्हिंग ब्लॉक लगेच उखडले
सुखवानी क्लासिकजवळील काम होऊन थोडेच दिवस झाले आहेत. तरी त्यावरचे ब्लॉक लगेच उखडले गेले आहेत. इतके निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. याकडे महापालिका कधी लक्ष देणार आहे ?.
- सीमा गांधी
PNE25V32648

उड्डाणपुलाखालील रस्ता बंद करा
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील रस्ता बंद करावा. जेणेकरून वाहतूक कोंडीत ८० टक्के सुधारणा होईल. चक्रपाणी वसाहतीकडे जाणारी वाहने महापालिकेकडून जेथून वळण घेतात तेथून ही बंदी करावी. कोंडी बऱ्यापैकी सुधारेल.
- संतोष घोलप, विशालनगर
PNE25V32646

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com