पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल
पिंपरी, ता. १९ : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक ६ कोटी ५३ लाख ५ हजार १५९ एवढी रक्कम ऑनलाइन जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांची अधिक वसुली झाली आहे. उर्वरित ३२ हजार ४३० नळधारकांची पाणीपट्टी अद्यापही थकीत आहे. पाणीपट्टी न भरल्यास नळजोड खंडित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असे मिळून सुमारे १ लाख ८० हजार ९०६ नळजोडधारक असून त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. कर संकलन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे ही वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली. मात्र शहरात अजूनही सुमारे ३२ हजार ४६० नळधारकांची पाणीपट्टी थकलेली आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
वर्षनिहाय पहिल्या तिमाहीत वसूल पाणीपट्टी
आर्थिक वर्ष / पाणीपट्टी (कोटीत)
२०१९-२०/ ३,१७,३२,१७०
२०२०-२१/ १०,०९,४२,५६०
२०२१-२२/ १०,४८,४९,३७०
२०२२- २३/ १२,५८,२१,७३३
२०२३ -२४/ १३,९५,५८,३८१
२०२४- २५/ १५,०८,१९,६५१
२०२५- २६/ १५,५३,११,७३०
रक्कम अशी झाली जमा... (सर्व आकडे रुपयांत)
- धनादेशांद्वारे : ५ कोटी ९० लाख ९८ हजार ५८५
- रोख स्वरूपात : ३ कोटी ९ लाख ७ हजार ९८६
- ऑनलाइन भरणा : ६ कोटी ५३ लाख ५ हजार १५९
- एकूण : १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३०
मीटर दुरुस्तीसाठी पुढाकार घ्या
पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी ग्राहकांना नादुरुस्त अथवा बंद असलेले पाणीपट्टी मीटर दुरुस्त करण्याबाबत लवकरच नोटिसा देण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पाणीपट्टी मीटर नादुरुस्त असल्याने रिडिंग घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बिलात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पाणीपट्टी मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मालमत्ता करासोबत पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरला आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे; अन्यथा थकबाकीदारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.