अन्यायकारक ‘डीपी’ रद्द करण्याची भूमिका
पिंपरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणांमुळे नागरिकांची घरे बाधित होत आहेत. अनेकांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. आराखड्याबाबत सुमारे ५० हजार हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांवर अन्याय होणार असेल तर आराखडामध्ये दुरुस्ती व्हावी किंवा तो रद्दच करावा, अशी भूमिका आमदार शंकर जगताप यांनी रविवारी कासारवाडी येथील पत्रकार परिषदेत मांडली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी व प्रश्नांची माहितीही त्यांनी दिली.
आमदार जगताप म्हणाले की, अधिवेशनात ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना मांडल्या. लक्षवेधी सूचनेत पिंपरी-चिंचवड डीपीतील बेकायदेशीर रस्त्यांची आरक्षणे रद्द करणे, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या, मालेगावमध्ये पाचशेच्या बनावट नोटांशी संबंधित गुन्हेगारी कारवाई, पत्रकार कल्याण महामंडळाची गरज आदींचा समावेश आहे. याचबरोबर मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार, धर्मादाय रुणालयातील सवलतींच्या योजनेची ऑनलाइन अंमलबजावणी, अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरणे, बनावट पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई आणि दर नियंत्रण कायदा, शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांच्या वेतन घोटाळ्याची एसआयटी चौकशी, ओला-उबेरसारख्या सेवा कंपन्यांच्या नियंत्रणासाठी समिती नेमणूक, एसटी महामंडळातील जाहिरात परवान्यांमधील गैरव्यवहार आदी तारांकित प्रश्न उपस्थित केले. औचित्याचे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली. काळेवाडीतील बेकायदेशीर चर्चवर कारवाई व धर्मांतर विरोधी उपाययोजनांबाबतही मुद्दा मांडला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.