रिक्षा, टॅक्सीचालक-मालकांच्या प्रश्नांसाठी जनसंवाद अभियान
पिंपरी, ता. २० ः रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो, टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांच्या वतीने जनसंवाद अभियान सुरु करण्यात आले आहे. याद्वारे तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो, टॅक्सी ट्रान्स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अभियान सुरू आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नाना गुंड व रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख अनिल शिरसाठ यांच्याहस्ते उद््घाटन झाले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष जाफर शेख, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष विशाल ससाणे, डांगे चौक विभाग अध्यक्ष सलीम पठाण, रिक्षा ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष सुखदेव लष्करे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या अभियानाद्वारे विविध समस्यांवर चर्चा करून हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदू शेळके, शहर सल्लागार संदीप कुरुंद, राहुल सस्ते, गणेश सस्ते, शेखर वागस्कर, अतुल आल्हाट, समीर आल्हाट, संजय वहिले, दीपक भालेकर, सुनील टेकाळे, रामदास सस्ते, अभिजित धोत्रे आदींनी परिश्रम घेतले.
-----