रावेतला ‘एक पेड माँ के नाम’चाही उपक्रमाचा उत्साह

रावेतला ‘एक पेड माँ के नाम’चाही उपक्रमाचा उत्साह

Published on

रावेत, ता. २० ः आईप्रती लहान वयातच मुलांमध्ये आदरभावना जागृत राहावी तसेच पर्यावरणाबद्दलजाणीव निर्माण व्हावी या हेतूने महापालिकेच्या रावेतमधील शाळा क्र.९७ मध्ये ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष उपक्रमांतर्गत लहान विद्यार्थांनी सुमारे ५० झाडे लावली. विशेष म्हणजे हीच मुले शाळेत दहावीपर्यंत शिकताना त्यांची जोपासनाही करणार आहेत.
सहगामी फाउंडेशन आणि ‘मस्ती की पाठशाला’ या संस्थांच्यावतीने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या आवारात इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात झाडे लावली. तसेच त्यांना पाणी घालून काळजीपूर्वक त्यांचे संगोपन करण्याची शपथही घेतली. शिक्षक व पालक वर्गाने या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलावर समाधान व्यक्त केले.
सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार, अतुल कामत, अमोल कामत, रसिक पिसे यांनी उपस्थित होते. याच कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही सहगामी फाउंडेशनच्यावतीने विनामूल्‍य वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या ७० विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अ‍ॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ‘आयडियल स्टडी’ अ‍ॅपमध्ये अतिशय सोप्या आणि समजण्यास सुलभ पद्धतीने सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देते. हे लक्षात घेऊन महानगरपालिका माध्यमिक शाळा, केशवनगर भाग शाळा रावेत येथील दहावीच्या सत्तर विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अ‍ॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी रसिक पिसे यांनी
दहावीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅपचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील या नव्या ॲपबद्दल आनंद व्यक्त करत त्याचा योग्य वापर करण्याचा संकल्प केला. या प्रेरणादायी उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा शिकलगार व संपूर्ण शिक्षकवृंदाने सहगामी फाउंडेशनचे विशेष आभार मानले.


PNE25V32951

Marathi News Esakal
www.esakal.com