ब्रँड डिझाईनमध्ये प्रज्ज्वल दिंडे प्रथम

ब्रँड डिझाईनमध्ये प्रज्ज्वल दिंडे प्रथम

Published on

पिंपरी, ता. २१ ः महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ब्रँड डिझाइन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्रज्ज्वल जयसिंग दिंडे (प्रथम), रोहित राजेंद्र घोडके (द्वितीय) आणि अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज (तृतीय) यांनी पारितोषिक मिळवले आहे.
‘हरित सेतू’ उपक्रमामार्फत महापालिका पादचारी केंद्रित रस्ते, सुसंगत पार्किंग व्यवस्था, मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौकावर भर देत आहे. ही संकल्पना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षम, समावेशक आणि शाश्वत वाहतूक प्रणालीच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने विशेष ब्रँड डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती.
देशभरातील सर्व डिझायनर्ससाठी खुली असणाऱ्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. डिझाईन, संकल्पना, मांडणी आणि सादरीकरण या विविध निकषांवर आधारित स्पर्धेचे परीक्षण असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ सदस्य, महापालिका अधिकारी, हरित सेतू प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञ व व्यावसायिक डिझायनर्सच्या परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने परीक्षकांनी दोघांनाही पारितोषिकाची संपूर्ण बक्षीस रक्कम देण्याची शिफारस केली आहे. विशेष ज्यूरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले.

एका विजेत्याचे डिझाईन ‘ब्रँड’
विजेत्यांपैकी एका विजेत्याचे डिझाईन हरित सेतू प्रकल्पाचे ब्रँड डिझाईन म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका वापरणार आहे. विजेत्यांना याबाबत ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. अंतिम निवड झालेल्या डिझाईनचे हक्क डिझायनर व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे संयुक्तपणे असेल.

‘‘ब्रँड डिझाईन स्पर्धेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना प्रतिबिंबित करणारी, लोकाभिमुख ब्रँड ओळख तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता. ही स्पर्धा पारदर्शक व निष्पक्ष तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडली आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com