संवाद माझा
गटाराचे पाईप हटवावेत
निगडी - प्राधिकरणातील गंगानगर पेठ क्र. २८ येथील मॅजेस्टिक हॉटेलजवळ चाळ क्रमांक १ येथील भूमिगत गटाराचे काम होऊन जवळपास १५ ते २० दिवस झाले. तरी येथील पाईप अजून ही उचलले नाही. त्यामुळे वाहतुकीला तसेच रहिवाशांना मोठ्या प्रमाणात समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी ते लवकरात लवकर उचलावे.
- सिराज बशीर शेख
NE25V33203
‘डीपी’चे दार गायब
थेरगाव येथील भूमकर चौक ते डांगे चौक मार्गावर डांगे चौकातील गजानन सवाई ट्रेडिंग कंपनी या किराणा मालाच्या दुकानाशेजारी ‘डीपी’चे दार उघडे असून त्याचा दरवाजा गायब झाला आहे. त्यामुळे कोणाही व्यक्तीच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. वाकड भागातील महावितरण कंपनी याकडे लक्ष देईल काय?
- ॲड. रामहरी कसबे, डांगे चौक, थेरगाव
PNE25V33202
स्वच्छतागृह सुरू करा
वाकडच्या कावेरीनगर भाजी मंडई येथील महापालिकेने बांधलेले स्वच्छतागृह बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाभोवती भाजीवाल्यांच्या गाड्या बेशिस्तपणे उभ्या केलेल्या असतात. स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी रस्ता पण ठेवलेला नसतो. स्वच्छतागृहाचा वापर ठराविक भाजी विक्रेते स्वतः ची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे करुन कुलूप लावून चावी स्वतः कडे ठेवतात. तरी कुलूपबंद स्वच्छतागृह नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- राहुल काटे
PNE25V33201
फांदी त्वरित उचलावी
चिंचवडजवळ केशवनगर भागात काकडे पार्कच्या पी इमारतीसमोर झाडाची फांदी तुटून पडलेली आहे. महानगरपालिकेने ती त्वरित हटवावी.
- सां.रा.वाठारकर, चिंचवड
PNE25V33200
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.