गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू

गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू

Published on

पिंपरी, ता. २१ ः गणेशोत्सवासाठी पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची आरक्षण सुविधा सुरू झाली आहे. २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून या पार्श्वभूमीवर पुणे एसटी विभागातर्फे कोकणवासीयांसाठी २५० विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सव आणि कोकण यांचे एक खास समीकरण आहे. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो. नोकरी, कामाधंद्यासाठी कोकणवासीय इतर शहरांत वास्तव्यास असतात. पण गणेशोत्सवात ते हमखास गावी जातात. याच चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळातर्फे राज्यभरातून एसटी बस सोडल्या जातात. कामाचे अगोदरच नियोजन करून नागरिकांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षण करता यावे, यासाठी एसटी महामंडाळाकडून त्याची घोषणा साधारण दीड ते दोन महिने अगोदरच केली जाते. गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला असताना एसटी प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे. एसटी प्रशासनाकडून चिपळूण, दापोली, देवरूख, गुहागर, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी या ठिकाणी जाण्यासाठी पुणे विभागातून २५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यात आणखी वाढ केली जाणार आहे. त्याचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

अठरा बसचे बुकिंग फुल्ल
एसटी प्रशासनाने गणेशोत्सवासाठी आरक्षण सुविधा खुली केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच १८ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने प्रवासी २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान तिकीट बुकिंगला जादा पसंती देत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

विशेष बसचीही सुविधा
गणेशोत्सवानिमित्त विशेष बससाठी नागरिकांना ग्रुप बुकिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रुप बुकिंग केल्यास नागरिकांना घराजवळून ते इच्छित स्थळी जाण्यासाठी विशेष बस देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या कुटूंबासमवेत किंवा नातेवाईकांसमवेत एकत्र प्रवास करता येणार आहे.

कोकणासाठी नियोजित बस संख्या
स्वारगेट स्थानक - १२०
पिंपरी चिंचवड - १३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com