वेग अन्् मती कुंठित करणारे गतिरोधक

वेग अन्् मती कुंठित करणारे गतिरोधक

Published on

पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड शहरात गतिरोधक जागोजागी चुकीच्या पद्धतीने उभारले गेले आहेत. परिणामी नागरिकांच्या आरोग्याची, तर वाहनधारकांच्या सुरक्षिततेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
नियमापेक्षा जास्त उंची, आडवे-तिडवे आणि अनावश्यक ठिकाणी उभारले गेलेले हे गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. या ठिकाणी अनेक अपघात घडल्याची माहिती समोर आली असून अनेक वाहनधारक आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांचे भाग आणि नागरिकांची हाडे त्यामुळे खिळखिळी होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मणका, मान आणि कंबरदुखी त्रस्त करीत आहे.
------
अभाव अन्् अतिरेक
- भक्ती-शक्ती चौक ते निगडी-प्राधिकरण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहनांची प्रचंड प्रमाणावर वर्दळ असूनही गतिरोधकांचा अभाव
- या चौकाच्या खूप आधी चुकीच्या ठिकाणी उंच आणि तीव्र उताराचे गतिरोधक
- परिणामी असंख्य वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण जाते
- यात वैयक्तिक चालकाची आणि वाहनाची आर्थिक हानी
- महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘फ’ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी पूर्वपरवानगी न घेता बांधणी
- काही ठिकाणी योग्य ठिकाणी अभाव
- अनावश्यकता नसलेल्या अनेक ठिकाणी बांधणी़
---
आरोग्याचा प्रश्न
- वाल्हेकरवाडीतील सेक्टर ३२ परिसरातील एसबीआय बँकेजवळील गतिरोधक फारच उंच असल्याने वारंवार अपघात
- शहरातील अशा काही अपघातांमुळे नागरिकांना कायमचे अपंगत्वही आले आहे, अशी माहिती सामाजिक संस्थांच्या पाहणीतून समोर आली आहे.
---
नियमांचा भंग
- इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष
गतिरोधकांचे उंची, रुंदी, रंगसंगती, स्थान व अंतर अशा मापदंडांचे पालन नाही
- रात्री गतीरोधकांवरील पांढरा रंग न दिसण्याने वाहनचालकांना धोका
---
वाहनचालकांना होणारे त्रास
- वाहनधारकांचा तोल जातो
- मणका, मान व कंबरेचे त्रास
- दुचाकीस्वार आणि वृद्ध नागरिकांना जास्त त्रास
- रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांमध्ये अडथळे
- वेग अचानक कमी होऊन वाहनाचे नुकसान
---
महापालिकेने शहरात बऱ्याच ठिकाणी चुकीचे गतिरोधक बनविले आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असंख्य प्राणघातक अपघात झाल्याचे संस्थेच्या पाहणीत आढळले. गतिरोधक नियमानुसार बसवावेत यासाठी संस्थेने पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मात्र कुणालाही अद्याप जाग आलेली नाही.
- नितीन यादव, अध्यक्ष, जागृत नागरिक महासंघ
...
शहरातील नियमात बसत नसलेले गतिरोधक त्वरित काढले जातील. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून लवकरच परिपत्रक काढण्यात येईल.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com