स्वच्छतागृहांची कामे बचतगटांना
पिंपरी, ता. २३ ः महापालिकेचे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई व देखभाल दुरुस्तीची कामे महिला बचत गटांना दिली आहे. त्याच्या खर्चासह विविध विकास कामांना स्थायी समिती सभेने मान्यता दिली.
महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप आदी उपस्थित होते. महर्षी वाल्मीकी, ऐश्वर्या, आवडी, भीमक्रांती, गायत्री, वैशालीताई काळभोर, भिमाई आदी महिला बचत गटांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई व देखभाल दुरुस्तीची कामे दिली आहेत. ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २०२४-२५ करिता वाकड भगवाननगर परिसरात नवीन जलवाहिनी टाकणे, वॉल्व्ह बसविणे, किवळे येथील विभागीय कार्यालय इमारतीमध्ये तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्या करिता फर्निचर कामे करणे, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजनासाठी खर्चास मान्यता, कासारवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे नवीन वीज मीटर घेण्यासाठी महावितरणला शुल्क देणे, मुख्याध्यापक, मुख्य प्रशिक्षक यांच्या मध्यप्रदेश येथील एकलव्य फाउंडेशनच्या अभ्यास दौऱ्यासाठीच्या खर्चास मान्यता देणे, आरोग्य विभागासाठी जंतूनाशक औषधे खरेदी करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ प्रभाग ३, ४ व ५ येथे केलेल्या ग्राफिकल वॉल पेंटिंग खर्चास मान्यता देणे, प्रभाग ११ मधील विविध रस्त्यांसाठी आयआरसी मानांकनानुसार राईज पेडेस्त्रियन तयार करणे, कुदळवाडी व पवार वस्ती येथील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, निगडी गावठाण परिसरात हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे, तसेच विविध सांस्कृतिक कामांकरिता मंडप व्यवस्था, त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक तसेच सहयोगनगर ते टॉवर लाईन रस्ता देखभाल व दुरुस्ती करणे, थेरगाव येथील नागुभाऊ बारणे शाळा इमारतीचे स्थापत्य विषयक कामे करणे, पिंपळे निलख विशालनगर येथे खोदलेल्या रस्त्यावरील चरांची दुरुस्ती व डांबरीकरण करणे आदी विषयांनाही मान्यता देण्यात आली.
परीक्षांसाठी खर्चास मान्यता
महापालिका शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रातील परीक्षेकरिता उत्तरपत्रिका, प्रगतिपुस्तके व संचयिका छपाई खर्चास मान्यता देणे, चऱ्होली येथे जकात नाका प्रस्तावाने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना अतिक्रमण विभागाच्या वापरासाठी प्रत्येकी एक बोलेरो पिकअप व तत्सम वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, इस्कॉन मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी रावेत खुली जागा क्रमांक ६ या ठिकाणी ११ महिन्यांच्या कालावधी करिता विनामूल्य वाहनतळ उपलब्ध करुन देणे, कासारवाडी आयटीआय वार्षिक परीक्षा बिल मटेरिअल खर्च करणे, जाहिरात रोटेशन धोरण २०२५-२६ आदी विषयांच्या खर्चासही मान्यता दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.