संवाद माझा

संवाद माझा

Published on

‘रम्ब्लिंग स्ट्रिप्स’ उखडल्याने खड्डे
आकुर्डीकडे जाण्याच्या रस्त्यावर, कुटे मेमोरियल हॉस्पिटल जवळ पांढऱ्या ‘रम्ब्लिंग स्ट्रिप्स’भोवतालचा डांबर निघून गेला आहे. तेथे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांना तिथून जाताना हादरे बसतात. रात्री अनेक वाहनचालकांची तारांबळ उडते. सहप्रवाशांनाही हादरे सहन करावे लागतात. त्यामुळे अपघातची शक्यता आहे, तरी महापालिकेने तातडीने दाखल घेऊन दुरुस्ती करावी.
- ऋषिकेश काशीकर, चिंचवड.
PNE25V33739

भटक्या प्राण्यांची व्यवस्था करावी
जुनी सांगवी माकन चौक येथे रस्त्यावर भटक्या प्राण्यांचे कळप फिरत असतात. या परिसरात ही संख्या वाढली आहे. मुख्य रस्त्यावर ते ठिय्या मांडतात. या मार्गावरून शाळा बस, कंपनी बस, ट्रक, मोठी वाहने जात असतात. वाहनधारकांनाच रस्ता बदलावा लागतो. त्यामुळे या प्राण्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे.
- मनोज पवार, पवारनगर
5V33738

नव्या पदपथांमुळे वाहतूक कोंडीत भर
प्राधिकरण निगडी ते नियोजित महापौर निवास मैदान या अंतर्गत रस्त्यावर पदपथाचे काम सुरू आहे. थेरगाव बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक, निगडी ते यमुनानगर रस्ता आहे. आधीच अंतर्गत रस्ता छोटा आहे. त्यात दोन्ही बाजूंना पदपथाची आवश्यकता नाही. चारचाकी वाहने पार्किंगच्या जागा काटकोनात ठेवण्यात येतात. गाड्या उचलून तिथे पार्क करणार का? आतापर्यंत ज्या रस्त्यांवर असे स्मार्ट पदपथ झालेत बहुतेक ठिकाणी वाहतूक कोंडीत भरच पडली आहे.
- भूषण नलावडे, प्राधिकरण निगडी
NE25V33737

दिघी-भोसरीमध्ये गुन्हेगारी वाढली
दिघी-भोसरी परिसरात सध्या गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या कोयता घेऊन फिरणारे गुन्हेगार चोऱ्या, घरफोड्या करत आहेत. गंगोत्री पार्क परिसरात पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यातच रात्री पुरेसे दिवे नसतात. ज्यामुळे अंधार असतो. याचा फायदा घेऊन चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे दिघी आणि भोसरी परिसरात चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.
-नितीन लावंड, भोसरी
PNE25V33741

काशिद चौकात वाहतूक कोंडी
काशिद चौक, पिंपळे गुरवमधील रस्त्याच्या विरुद्ध दिशेला विस्कळित पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत.
त्यामुळे दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी होते आणि तासनतास वाहनांच्या रांगा लागतात. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
-श्रीकांत बारवकर, पिंपळे गुरव

PNE25V33740

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com