सीए फायनल परीक्षेत
अथर्व भागवतेचे यश

सीए फायनल परीक्षेत अथर्व भागवतेचे यश

Published on

पिंपरी, ता. २३ ः पिंपरी-चिंचवड येथील अथर्व धीरज भागवते याने यंदा मे महिन्यात झालेल्या सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे फेब्रुवारीत वडील जीबीएस (गुलीयन बॅरी सिंड्रोम) आजारी असल्याने त्याला तणावात अभ्यास करावा लागला. त्याने यापूर्वीही त्याने सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले होते.
पिंपरी-चिंचवड आयसीएआय शाखा प्रमुख सीए वैभव मोदी तसेच आर्टिकलशिप ऑर्गनायझेशन जीटी भारतचे पदाधिकारी सीए शशी तडवळकर, सीए श्रीरूपा सक्सेना, सीए प्राची कदम, सीए मोहित रजलानी आणि सीए तुषार अरोरा यांनी अथर्वचे अभिनंदन केले.
अथर्वचे वडील प्राध्यापक आहेत, तर आई गृहिणी आहे. अभ्यासातील सातत्य आणि सर्वांच्या मोलाच्या सहकार्याचा यशात मोलाचा वाटा असल्याची भावना अथर्वने व्यक्त केली.
---
फोटो
33798

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com