नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मंगळवारपर्यंत मुदत

नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मंगळवारपर्यंत मुदत

Published on

पिंपरी, ता.२४ ः जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पाचवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरताना जातीचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक राहिले नाही. त्यामुळे आता अर्ज भरताना अडचण येणार नाही, अशी माहिती
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य भुलन सी. सरोज यांनी दिली. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मंगळवार (ता.२९) पर्यंत अर्ज करता येणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय समितीने स्वतःच्या नावाच्या जातीचा दाखला अनिवार्य केला होता. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या दाखले सादर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु आता जातीचे प्रमाणपत्र बंधनकारक केले नसल्याने आशयाचे संदेश प्राप्त झाले आहेत, असे प्राचार्य भुलन सी. सरोज यांनी सांगितले.


शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत ही परीक्षा घेतली जात असून ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२५ आहे. अर्ज http://navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळांवर भरता येईल. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी (२०२६-२७) जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा सीबीएससी बोर्डामार्फत घेतली जाणार आहे.

‘आधार’ अद्ययावत हवे
अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर दिलेला प्रॉस्पेक्ट्स काळजीपूर्वक वाचावा. विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी २०२५-२०२६ मध्ये शहरातील शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त शाळेत शिकत असावा. तो शहराचा रहिवासी असावा. आधार कार्ड अद्ययावत असणे आवश्यक आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिकलेला असावा.

प्रमाणपत्र ‘जेपीजी’मध्ये हवे
विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१४ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत झालेला असावा. अर्ज करताना अपलोड करावयाच्या प्रमाणपत्रांमध्ये जात, दिव्यांग, लिंग, शाळा ग्रामीण की शहरी याची अचूक माहिती भरावी. ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र जेपीजी फॉरमॅटमध्ये असावे.

विद्यार्थी, पालकांना आवाहन
अर्ज भरण्याची अंतिम तारीखजवळ आली आहे. पात्र आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षेला बसावे, असे आवाहन प्राचार्य भुलन सी. सरोज यांनी केले आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


‘‘ नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षासाठी मंगळवार (ता.२९) ही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पुणे जिल्हा नोंदणी गतवर्षी पेक्षा कमी म्हणजे ७० टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे ८ हजार ऑनलाइन अर्ज पुणे जिल्ह्यामधून भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. तरी सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.’’
- रजिया खान, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com