संवाद माझा
थेरगावात खासगी बसचा थांबा सुरू करा
थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे जळगांवला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा थांबा पुन्हा देण्यात यावा. सध्या बसचा थांबा भूमकर चौकात महामार्गावर आहे. तेथे प्रवाशांसाठी आसन व्यवस्था नाही. महामार्गावर बस थांबतात, पण प्रवाशांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. जवळपास प्रसाधनगृह नाही. प्रवाशांची गैरसोय होतेय. जळगावला जाणाऱ्या सर्व बसला रात्री नऊ-साडेनऊ नंतर शहरात प्रवेश दिल्यास वाहतूक कमी असल्याने पिंपरी चिंचवड पोलिस यांनी परवानगी द्यावी.
- चेतन डांगे, थेरगाव
PNE25V34028
पैशांची उधळपट्टी, विजेचा गैरवापर
पिंपळे निलख विशालनगर येथे जगताप चौक ते वाकडच्या कस्पटे चौक मार्गावर दुतर्फा पदपथांवर सुशोभीकरणासाठी बसविलेले पदपथ दिवे खरेच गरजेचे आहेत का? पदपथावर अंधार पडत असेल, तर पदपथ दिवे बसविणे योग्य ठरेल, पण रस्त्याच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश पदपथावर पडत असताना पदपथावर अधिकचे दिवे कारण नसताना बसविणे म्हणजे पैशांची उधळपट्टी व विजेचा गैरवापर आहे. नागरिकांना विकास हवा आहे; पण त्याचा गरज नसताना अतिरेक केला जाऊ नये, हीच अपेक्षा.
- सनी शिंदे, पिंपळे निलख.
NE25V34027
निष्पर्ण केलेले झाड पुन्हा बहरले
पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांना अडथळा होतो, म्हणून मोशी गावाजवळील हे पिंपळाचे झाड पूर्ण निष्पर्ण करण्यात आले होते. पण, कुणीही सांत्वन किंवा प्रेरणा देणारे नसतानाही हे झाड पुन्हा बहरले आहे. यातून मानवाने धडा घेण्याची गरज आहे.
- सुनील डोबे, भारतमाता चौक, मोशी
Id: PNE25V34026
रस्ता दुरुस्ती तातडीने करावी
एम्पायर इस्टेट येथील विजय सेल्स, जयहिंद शोरूम समोर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अवघ्या दोन महिन्यांत खड्डेमय झाला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील ओबडधोबड रस्त्यासारखी येथील परिस्थिती झाली आहे. दुचाकीवर जाणाऱ्यांसाठी हा रस्ता खूपच धोकादायक झाला आहे.
- सुयश कुलकर्णी, चिंचवड
NE25V34024
‘सारथी’ प्रणालीवर तक्रार निरुपयोगी
तानाजीनगर, चिंचवड येथील सावित्रीबाई फुले उद्यानासमोर रस्त्याची पालिका प्रशासनाने दुरवस्था केली आहे. आम्ही ‘सारथी’ प्रणालीवर तक्रार देऊनही याच्याबद्दल काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी, पालिका प्रशासनाने रस्त्याची स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे.
- शेखर मुदलियार, तानाजीनगर
PNE25V34025
Associatededia Ids : PNE25V34024, PNE25V34025, PNE25V34026, PNE25V34027, PNE25V34028
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.