पांडुरंग प्रसन्न
पालखी सोहळा परंपरेचे जनक
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचे जनक श्री संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांची पुण्यतिथी श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात यंदा २८ जुलै रोजी परंपरेनुसार झाली. त्यांच्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी हा लेख...
- विक्रमसिंह मोरे, विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू
दे श-विदेशातील ज्ञानवंत, गुरूवंत व सर्व समाजातील जनलोक या पालखी सोहळ्याकडे भक्तिप्रेमाने पाहतात, अनुभवतात. या वारी, पालखी सोहळ्याची सुरुवात तपोनिधी नारायण महाराज यांनी केली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रामुख्याने मुख्य देऊळवाड्यात सर्व मोरे वंशज व देहूकर सोहळ्यातील सर्व दिंड्यावाले उत्साहाने व काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन करून सप्ताह आयोजित करतात. श्रावण शु. चतुर्थीला सांगता समारंभ असतो. त्यावेळी काला करून करत असतो. वारीची परंपरा मोरे घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे आणि ती आजही तुकोबारायांचे वंशज चालवत आहेत. पुढेही चालत राहील.
पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।
तपोनिधी नारायण महाराज यांनी आळंदी पंढरीची वारी करत असताना त्यांनी पालखी सोहळ्याची परंपरा १६८५ पासून सुरू केली. त्यापूर्वी वारी सुरू होती. मात्र, पालखी सोहळ्याचे स्वरूप नारायण महाराज यांनी दिले. देहूतून तुकोबारायांच्या आणि आळंदीतून माउलींच्या पादुका एकत्रितपणे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ भजन म्हणत पंढरीकडे जात. याच्या अगोदर कोणत्याही संतांच्या पालख्या त्यांच्या मूळगावाहून निघत नव्हत्या. नारायण महाराजांनी वारीला-पालखी सोहळ्याचे रूप दिले. या दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ‘ज्ञानोबा तुकाराम’’ भजन म्हणत आषाढी एकादशीला पंढरीस जात. रामायणात भरताने ज्याप्रमाणे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांची पूजा करत राज्यकारभार केला, अगदी तसेच नारायण महाराजांनी केले. नारायण महाराज त्याचेही देहावसान देहूत झाले.
तेव्हापासून आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांचे पालखी सोहळे निघू लागले. लाखोंच्या संख्येने वारकरी त्यामध्ये सहभागी होऊन विठ्ठलभक्तीचा आनंद उपभोगत आहेत. वारीला पालखी सोहळे सुरू करण्याची मुहूर्तमेढ नारायण महाराज यांनी रोवली. आजही आम्ही मोरे वंशज ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून पंढरीस जात आहेत.
PNE25V35241
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.