रस्त्याच्या कामाच्या दर्जाची वरिष्ठांकडून तपासणीच नाही
वाचक लिहितात
‘पाऊस थांबेना आणि खड्डे बुजवेनात’ ही बातमी वाचली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील जवळजवळ सर्वच गावांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. एकही रस्ता खड्डामुक्त नाही. आता पावसाळ्यात महानगरपालिका वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. मुळात हे सर्व पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे होते. आता पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे कारण महानगरपालिका देत आहे. मुळात रस्त्यांचा कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळेच प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वसाधारण पाऊस असतो. विदर्भ किंवा मुंबईप्रमाणे कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत नाही. हवामान खात्याच्या व्याख्येप्रमाणे २४ तासांत ६५ ते ११५ मिलिमीटर पाऊस झाला तरच तो मोठा पाऊस धरण्यात येतो. पिंपरी-चिंचवडमध्ये इतक्या प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे पावसाची सबब अयोग्य आहे. रस्ते तयार करताना वरिष्ठांकडून दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तपासणी होत येत नाही. महानगरपालिका वेगवेगळ्या वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते दुतर्फा खोदते. नागरिकांकडूनही नळजोडणी व इतर कारणांसाठी रस्ते सर्रास खोदले जातात. याबाबत महानगरपालिकेला जाब विचारला जात नाही, हे सुद्धा खड्डे पडण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे खड्ड्यांबाबत तात्पुरती डागडुजी करून उपयोग होणार नाही. उलट रस्त्यावर खडी पसरून छोटे-मोठे अपघात रोजच होतात. अनेक ठिकाणी खड्ड्यात ब्लॉक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता कुठेही समतल नसतो. घाई गडबडीत काम उरकून ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था होते. त्यामुळे घाई न करता कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते तयार करावे, इतकीच माफक अपेक्षा आहे.
- सुरेश लुणावत, किवळे
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.