संवाद माझा

संवाद माझा
Published on

गोदामातील कामाने झोपेत व्यत्यय
पिंपळे सौदागरच्या काटे वस्ती रस्त्यावर ऑर्किड सोसायटी व कस्तुरी हाउसिंग सोसायटीजवळ एका रिकाम्या जमिनीवर पत्र्यातील गोदाम वजा वेअरहाऊसमध्ये दिवस-रात्र काम सुरू असते. रोज रात्री दोन-अडीच वाजेनंतर तेथे अवजड सामानाचे कार्टन अनलोड केले जातात. अनलोडवेळी दणका बसवणारे मोठे भयानक आवाज येत राहतात. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिक, आय. टी. व्यावसायिक, आजारी व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांची झोप एकदम दचकून उघडते. झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे पुढचा कार्यदिवस कठीण होतो. कृपा करुन हे भयानक आवाज बंद करण्याची व्यवस्था करावी.
- सच्चिदानंद भागवत, पिंपळे सौदागर
PNE25V35982

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी
जुना पुणे - मुंबई महामार्गावरील निगडीमधील टिळक चौकातील हे छायाचित्र आहे. काही अन्य कामांसाठी रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्याऐवजी तकलादू पद्धतीने पेव्हिंग ब्लॉक्स टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. याची ‘मोडस ऑपरेंडी’ दाखवणारे हे उदाहरण आहे. अशा प्रकारच्या रस्ता दुरुस्तीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असेल; तर ते दुदैवी आहे. करदात्यांच्या कष्टाच्या कमाईची ही उधळपट्टी आहे.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE25V35981

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करा
भोसरी - गवळीनगर रस्त्यालगतच्या परिसरात एक मोठी लहान मुलांची शाळा आहे. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्‍यावर सर्व लहान मुले ये - जा करत असतात. त्यामुळे सर्व रस्त्यांवर चालताना पालक व लहान मुलांना त्रास होतो. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. वाहन चालक कसरत करतात. गवळीनगर रोड २ व ३ चे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु गेल्या ६ वर्षांत एकदाही डांबरीकरण केले नाही. आता पावसाळ्यापूर्वी अर्धा रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. परंतु अर्धा केलाच नाही. हा रस्ता दिघी रोडसाठी एक छोटा पर्याय आहे. त्यावरील खड्ड्यांत पाणी साचते.
- धर्मा पाटील, भोसरी
PNE25V35978

वाहतूक नियंत्रक दिवे तातडीने बसवा
मोशी - आळंदी रस्त्यावर वाहनांची संख्या आता वाढलेली आहे. त्यात लक्झरी बस, अवजड वाहने, टेम्पो, मोटारी, रिक्षा तसेच दुचाकी यांचा समावेश आहे. डुडूळगाव येथील या रस्त्यावर पुणेरी स्वीट कॉर्नर येथे मोठा चौक आहे. या चौकात पादचाऱ्यांची वर्दळही खूप असते. या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहेत. भविष्यात येथे मोठे जीवघेणे अपघात होऊ शकतात. प्रशासनाने या चौकात त्वरित वाहतूक दिवे बसवून भविष्यात होणारी जीवितहानी व वाहनांचे नुकसान टाळावे.
- दिलीप पाटील, गोविंदबाग, डुडूळगाव
PNE25V35983

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई हवी
चिखली, पिंपरी चिंचवड शहरातील काही भागांमध्ये, विशेषतः मोकळ्या जागा आणि निसर्गात कचरा टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याने परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका या समस्येची दखल घेऊन कचरा उचलावा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे यासारख्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने याची दखल घ्यावी.
- राजेंद्र अबादगिरे, चिखली
PNE25V35980

अपघातास महापालिका जबाबदार
पुणे - मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील मध्यभागी सिमेंट रस्त्यावर अनेक चीरा आणि खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यातून जाताना दुचाकी वाहने हमखास अडकून तोल जाऊन घसरून पडायची शक्यता आहे. त्याने मोठी जीवितहानी होऊ शकते. ही बाब लक्षात येताच तिथे झाडाची फांदी उचलून त्या पडलेल्या रस्त्यात टाकून रस्ता बंद केला गेला. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका बीआरटी विभागाला व्हिडिओद्वारे दाखवून ही समस्या मांडली आणि तातडीने हा रस्ता बुजवून नीट करण्याची सूचना केली आहे. भविष्यात दुदैवी अपघाताची घटना घडली. तर त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील.
- यलप्पा वालदोर, कासारवाडी
PNE25V35977

जाधव सरकार चौकात अस्वच्छता
स्पाईन रोड वरील जाधव सरकार चौक येथे चौकात पाणी साचत असून घाण पसरली आहे. तसेच प्रचंड दुर्गंधीचा वास येत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या ठिकाणी पाणी साचणार नाही व दुर्गंधी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- शरद जाधव,
PNE25V35987

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com