पाच पोलिस अधिकारी सेवानिवृत्त

पाच पोलिस अधिकारी सेवानिवृत्त

Published on

पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त सतीश कसबे यांच्यासह तीन उपनिरीक्षक व एक सहायक उपनिरीक्षक गुरुवारी (ता. ३१) सेवा निवृत्त झाले.
वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश कसबे, उपनिरीक्षक हनुमंत आवटे, विनोद पाटील, प्रमोद पारवे तसेच सहायक उपनिरीक्षक राजेंद्र मोरे अशी सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, वरिष्ठ निरीक्षक नितीन लांडगे आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com