लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास उलगडला

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास उलगडला

Published on

शाहिरी, हलगी वादनातून लोकशाहिरांना अभिवादन

महापालिकेतर्फे निगडीत विचार प्रबोधन पर्व; अण्णा भाऊ साठे यांचा उलगडला जीवनप्रवास

पिंपरी, ता. १ ः शोषित, वंचित आणि उपेक्षितांच्या वेदनांना शब्दरूप देणारे, आक्रोशाला आवाज देणारे, समाज परिवर्तनासाठी लेखणी चालवणारे जनकवी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात शाहिरी जलसा, पारंपरिक हलगी वादन करण्यात आले. ठिकठिकाणी ताशा, पथक वाजवत आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही ठिकाणी एकपात्री नाट्य प्रयोग सादर करण्यात आले.
महापालिकेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात केले आहे. त्याचा प्रारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला. विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नितीन घोलप, सुनिल भिसे, सतिश भवाळ, नाना कसबे, सुनिल भिसे, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते. महापालिका भवनात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर अभियंता मकरंद निकम उपस्थित होते. निगडीतील कार्यक्रमाची सुरुवात दत्तू चव्हाण आणि सहकाऱ्यांचे सनई वादन आणि येडेश्वरी हलगी ग्रूपचे सागर यादव यांच्या हलगी वादनाने झाली. चंदन कांबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित स्फूर्तिदायक गीते सादर केली. शाहीर बापू पवार यांचा ‘शाहिरी जलसा’ आणि बापू पवार यांनी शाहिरी सादर केली. शेखर साळवे आणि सहकाऱ्यांनी परिवर्तनवादी आणि प्रखर साहित्याची झलक सादर केली. पाच दिवसीय प्रबोधन पर्वामध्ये विविध व्याख्याने, काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

लोकहितवादी सेवा संघ
लोकहितवादी सेवा संघाने ताशा, पथक वाजवत आणि घोषणांनी परिसर दणाणून टाकला. लोकशाहिरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. विशाल वाघमारे, धर्मराज बनसोडे, समद शेख, अतिश दुधावडे, रोहित चंदणे, विकास वाघमारे, आशा वायडंडे, निगम राय, जयश्री वडले, दत्तात्रय व्हनकडे, राजेश दास आदी उपस्थित होते.

संत रोहिदास विचार समिती
गणेश तलाव संत रोहिदास विचार समितीने विष्णू सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. उत्तम मोरे, बाबासाहेब हनवते, उत्तम मोरवेकर उपस्थित होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. आ

पीएमश्री विद्यालय
महापालिकेच्या थेरगाव येथील पी. एम. श्री माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर एकपात्री नाट्य प्रयोग सिद्धार्थ मोरे यांनी सादर केला. अण्णा भाऊंच्या बालपणापासून ते महाराष्ट्राच्या मुक्ती संग्रामापर्यंतचा जीवन प्रवास उलगडून दाखवला. मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, हर्षदा राऊत, एम. एस. सायखेडे, एम. एस. आव्हाड, व्ही. एल. सावंत, बी. के. साळवे, एस. जी. जाधव, एस. ए. तुपे, एस. ए. भोसले, बी. डी. बेद्रे, एस. एच. सुतार, डी. ए. जाधव, बी. पी. जगताप, एम. एस. मुंढे, एन. डी. जाधव, आकिब एस., टी. ए. शेख, एम. एन. आटोळे उपस्थित होते. प्रास्ताविक विनय सोनवणे यांनी केले. आभार रामकुमार शेडगे यांनी मानले.

संस्था, संघटना
संविधान आर्मीचे प्रदेशाध्यक्ष रामदास ताटे; भिमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष सूरज गायकवाड, महेश अरुण, सुनील कांबळे आणि शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, अहमद कुरेशी, कुतबुद्दीन होबळे, विकास वाघमारे, लालासाहेब गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com