चिंचवडमध्ये रंगणार ‘सोलफुल किशोर’!

चिंचवडमध्ये रंगणार
‘सोलफुल किशोर’!
Published on

पिंपरी, ता. २ ः किशोरकुमार यांनी आपला अनोखा आवाज आणि बहुरंगी गायकीने संगीतप्रेमींच्या हृदयात अढळस्थान मिळविले. त्यांच्या ९६ व्या जन्मदिनानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सोलफुल किशोर’ या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे.
या मैफलीतून किशोरकुमार यांच्या अजरामर गीतांना आधुनिक साज चढवून पुणे आणि आसपासच्या भागांतील रसिकांना एक आगळी-वेगळी संगीतमय सायंकाळ अनुभवता येणार आहे. आपल्या सुमधुर आवाजाने चित्रपटसृष्टीवर आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक म्हणून किशोर कुमार सर्वपरिचित आहेत. त्यांची वेगवेगळ्या शैलीतील गाणी आणि आवाजाचे आजही अनेकजण दिवाने आहेत.
किशोरकुमार यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित या संगीत मैफलीत ‘रोते हुए आते है सब’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘जीवन से भरी तेरी आँखे’, ‘हे मैने कसम ली’, ‘अपनी तो जैसे तैसे’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर होणार आहेत. त्यांची अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात. त्यांच्या गीतांना आणि हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळालाही या कार्यक्रमातून उजाळा दिला जाणार आहे.
किशोर कुमार यांची निवडक गाणी जितेंद्र भुरूक आपल्या सहकाऱ्यांसह सादर करतील. या मैफलीतून कलाकार किशोर कुमार यांना मानवंदना देतील. कार्यक्रम सशुल्क असून प्रवेशिका ‘बुक माय शो’वर उपलब्ध आहेत.
---

हे लक्षात ठेवा
काय ? ः ‘सोलफुल किशोर’ संगीत मैफील
कधी ? ः ७ ऑगस्ट २०२५, गुरुवार
केव्हा ? ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com