पिंपरी-चिंचवड
अण्णा भाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन
पिंपरी, ता. ३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रशालेत साजरी करण्यात आली. शाळेच्या संत तुकारामनगर येथील सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर, यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सृष्टी माशाळकर, सानिया कुन्नूर, करण मठपती, मेहबूब कन्नूर, आनंदी यादव या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्लिशमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, शिक्षण मंडळाचे माजी-उपाध्यक्ष मायला खत्री, राजू आवळे,मुख्याधापिका मनीषा पाटील, संतोष इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन दादाभाऊ आल्हाट यांनी केले. तर, अण्णा भाऊ साठे सेवा संघाचे कार्याध्यक्ष सुधीर कांबळे यांनी आभार मानले.