आता दर दहा मीटरवर, एक देशी झाड

आता दर दहा मीटरवर, एक देशी झाड
Published on

पिंपरी, ता. २ : पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्षांची दुतर्फा लागवड करण्यात येत आहे. काही भागांतील विकसित रस्त्यांवर दुतर्फा झाडे दिसून येत नव्हती. त्या अनुषंगाने महापालिकेकडून पावसाळ्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
निगडी प्राधिकरणाप्रमाणेच शहरातील इतर भागांतील बीआरटीसह अन्य विकसित रस्त्यांवर हिरवेगार वृक्ष असावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांवर पदपथा शेजारील जागांमध्ये दर दहा मीटर अंतरावर पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर व स्थानिक हवामानाशी सुसंगत अशा देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक मोकळ्या जागांवरदेखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहर हिरवेगार व निसर्गसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे.


कोणत्या झाडांची लागवड
रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या देशी प्रजातींच्या वृक्षांमध्ये कडुलिंब, ताम्हण, कदंब, वड, पिंपळ, आकाशनीम, बकुळ, अर्जुन, मोहगणी, सोनचाफा, पारिजात अशा वृक्षांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी बांबू आणि आवश्यकतेनुसार ‘लोखंडी ट्री गार्ड’ बसवण्यात आले आहेत. या वृक्षांच्या देखरेखीच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे.


प्रभागनिहाय झालेले वृक्षारोपण
(आकडेवारी ३१ जुलै २०२५ पर्यंतची)
‘अ’ प्रभाग : २०१
‘ब’ प्रभाग : ९१०
‘क’ प्रभाग : २०४८
‘ड’ प्रभाग : ६५०
‘ई’ प्रभाग : ७३१
‘फ’ प्रभाग : ४६५
‘ग’ प्रभाग : २३०
‘ह’ प्रभाग : २०६

रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com