‘शिवरायांचे विचारांचा अंगीकार करा’
(कॅम्प एज्यु. सोसायटीचे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय)
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी शिवरायांचे आचार आणि विचारांचे चिंतन करावे. आजच्या जगात जास्त गरज आहे ती महाराजांच्या विचारांनी चालण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. आजच्या तरुण पिढीने निव्वळ मावळा म्हणवून न घेता महाराजांचे विचार आचरणात आणले तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे चमकल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज फक्त पुजायची नाही तर जगायची गोष्ट आहेत, असे उद्गार डॉ. केदारनाथ फाळके यांनी काढले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद बी. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांवर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी स्वागत केले. डॉ. फाळके यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन प्रा. रणजीत पाटील यांनी केले. प्रा. शेखर खैरनार यांनी आभार मानले.
(36926)
महिला सबलीकरण काळाची गरज
(राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन)
जेएसपीएम संचालित ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ विषयावर कार्यशाळा झाली. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मिता ससे यांनी महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्या, त्यांची लक्षणे, उपचार, घ्यावयाची काळजी, महिलांचा आहार, वेगवेगळे आजार, उपयुक्त लसी याविषयी मार्गदर्शन केले. विद्याभवन स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा साठे, प्राचार्य डॉ. डी. एस. भापकर, विभाग प्रमुख डॉ. पी. एम. वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. जयश्री धोंडे यांनी केले. आभार सीमा सोनवणे यांनी मानले. प्रा. निलंबिका इंगलगी, प्रा बी. बी. कासले, पी. बी. गायकवाड, व्ही. सी. चौधरी, सीमा सोनव, सुनिता मुळूक, शुभांगी रसाळ यांनी संयोजन केले.
(36928)
आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन पुरस्कार
(एमआयटी कॉलेज, आळंदी)
इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ड्रायव्हिंग सस्टेनॅबिलिटी ः इनोव्हेशन, इम्पॅक्ट ॲंड इन्क्लूशन या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. श्रीराम कारगावकर व प्रा. डॉ. सुनील महाजन यांच्या संयुक्त संशोधन प्रबंधाला (भारतामधील पर्यावरणपूरक डिजिटल उत्पादनांबाबत ग्राहकांच्या पसंतीचे सांख्यिकीय मॉडेलिंग : शाश्वत वापरासाठी डेटा-आधारित दृष्टिकोन) बेस्ट रिसर्च ॲवार्ड प्राप्त झाला आहे. त्यांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून दिलेल्या या अभ्यासाला विद्वत्तेचा ठसा मिळवून दिला आहे. या संशोधनात भारतीय लोकसंख्येतील विशेषतः तरुण, डिजिटल-जाणकार आणि पर्यावरण-जागरूक ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला आहे. माईर्स एमआयटी आर्ट्स, कॉमर्स ॲंड सायन्स कॉलेज आळंदी यांच्या आयोजनाखाली आणि अवंतिका युनिव्हर्सिटी व वेदांत नॉलेज सिस्टिम लिमिटेड यांच्या सहकार्याने परिषद झाली. संस्थेचे संचालक प्रा. डॉ. बी. बी. वाफारे यांनी दोघांचे अभिनंदन केले. हे यश आंतरशास्त्रीय सहकार्य व समाजाभिमुख संशोधनासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. डॉ. वाफारे यांच्यासह प्रा. डॉ. नितीन राणे, प्रा. डॉ. अमोल माने यांचे सहकार्य लाभले.
प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रेरणा
- गणेश सुरवसे (मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज निगडी येथे प्रथम वर्ष बी. कॉमच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन झाले. डॉ. दामोदर कुलकर्णी, डॉ. प्रकाश दीक्षित आणि प्रियांका परमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शैक्षणिक आणि करिअरसंबंधी मौल्यवान मार्गदर्शन केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. धन्वंतरी नरवडे, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे आणि प्राचार्य डॉ. मनोज साठे, शैक्षणिक समन्वयक प्रा. डॉ. प्रसन्न चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. नरवडे, प्रा. चैतन्य खोलमकर व प्रा. अश्विनी केंडे यांनी केले.
(36927)
जलसंवर्धन काळाची गरज
मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज मोशी
पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत ‘जलसंवर्धन ः काळाची गरज’ या विषयावर मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज मोशी येथे व्याख्यान झाले. यात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रवीण मोरे (जलप्रेमी व यशदा फाउंडेशनचे सदस्य) यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले व उपप्राचार्य डॉ. वृषाली तांबे उपस्थित होते. मोरे म्हणाले, ‘‘पाणी हेच एकमेव नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे ते जपणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.’’ शोष खड्डा, पाणवठ्यांचे संवर्धन अशा विविध प्रभावी उपाययोजना त्यांनी सांगितल्या. ‘वॉटर बजेटिंग’बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व समजून घेत पाणी वाचवण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्याचा निश्चय केला. भविष्यासाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा हा संदेश अधोरेखित केला. सूत्रसंचालन प्राची दुसाने यांनी केले. रेखा भालेराव यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.