पिंपरी-चिंचवड
प्रा. कल्याणी सहारे यांचे पुस्तक प्रकाशित
पिंपरी, ता. ५ ः आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. कल्याणी सहारे यांनी बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनॅलिसिस असे पुस्तकाचे नाव आहे. जळगावच्या प्रीतम प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रा. सहारे यांना अध्यापनासह औषध निर्मिती कंपनीतील कामाचाही अनुभव आहे. ‘विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे जाईल अशा शैलीत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा उपयोग होईल,’ असे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले.
-----