पिंपरी-चिंचवड
पिंपरीत वधुवर मेळावा उत्साहात
पिंपरी, ता. ४ ः बी. टी. अडवानी धर्मशाळा येथे सिंधू प्रोग्रेसिव मॅट्रिमोनिअल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने वधूवर मेळावा पार पडला. मेळाव्यास १४० वधूवर आणि त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुमार मोटवानी आणि जवाहर कोटवानी यांनी स्वागत केले. नोंदणी मनोहर जेठवानी, ताहिल चुघवानी, श्रीचंद नागरानी, संतवंतकौर पंजाबी, यांनी केली. बाबा गोविंदराम झुलेलाल मंदिर येथील साई सोनूराम आणि उद्योजक दीपक पंजाबी आणि परमानंद जमतानी, ऍड नरेश पंजाबी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.