विद्यार्थी-शिक्षक साहित्य
संमेलन शुक्रवारी पिंपरीत

विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन शुक्रवारी पिंपरीत

Published on

पिंपरी,ता. ४ ः विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालय यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. ८ ) बारावे विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन होईल, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे व स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर अध्यक्षस्थानी असतील. रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल.
यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्काराने गौरविण्यात येईल. दुपारच्या सत्रात ‘लोकजागर अभिजात मराठीचा’ कवी संमेलन होईल. त्यात प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, संगीता झिंजुरके, सीमा गांधी, संतोष घुले, डॉ. बंडोपंत कांबळे सहभागी होतील. ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब वाघेरे (महात्मा फुले समाजसेवक पुरस्कार), शिवव्याख्यात्या सुलभा सत्तूरवार (विश्वबंधुता लोकशिक्षक पुरस्कार) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांनाही गौरविण्यात येईल.
----

Marathi News Esakal
www.esakal.com