‘आरटीई’ प्रवेशासाठी ३४८ विद्यार्थी प्रतीक्षेत

‘आरटीई’ प्रवेशासाठी ३४८ विद्यार्थी प्रतीक्षेत
Published on

पिंपरी, ता. ११ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर शहरातील २ हजार १०१ बालकांचे शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात येत आहे. मात्र, प्रक्रियेतील संथगतीमुळे ३४८ जागा अजूनही रिक्त आहेत. परिणामी, १५ एप्रिलपर्यंत प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्यातील प्रवेशाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिल्या सोडतीतील प्रक्रिया १० मार्चपर्यंत राबवली. दरम्यान, निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १८ मार्चपासून प्रतीक्षा यादीतील टप्पा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. आपल्या बालकांचे प्रवेश शाळेत जाऊन २४ मार्चपर्यंत निश्चित करावयाचे होते. मात्र, पुन्हा प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेशासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. तरी, प्रतीक्षा यादीत आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

तीन वेळा वाढवली मुदत
‘आरटीई’ सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २ हजार १०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशाची वाढीव मुदत ४ एप्रिल रोजी रोजी संपली. शहरात यंदा ‘आरटीई’च्या ६९७ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने याला पुन्हा १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष प्रक्रियेकडे लागले होते. त्यानंतर तीन वेळा मुदत देण्‍यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश तत्काळ निश्चित करावयाचे आहेत.


प्रतीक्षा यादी
उन्नत केंद्र / शाळा / एकूण जागा / प्रवेश / शिल्लक
पिंपरी - ६२ - ३७७ -१२४-२५३
आकुर्डी - १०८-६६९-२२५-४४४
एकूण - १७० - १,०४६ - ३४९ - ६९७


शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत संपली असून, आता दुसऱ्या फेरीमध्ये प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात येणार आहे. मात्र, पाल्याला प्रवेश देण्यासाठी काही पालक उदासीन दिसून येत आहेत. प्रवेशस्तरावर २५ टक्के राखीव ठेवण्याची तरतूद असल्याने प्रवेशाचा कोटा पूर्ण करावा लागत आहे.

- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com