एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून फसवणूक

एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून फसवणूक
Published on

पिंपरी : एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून एकाची सहा लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑनलाइन माध्यमातून घडली. याप्रकरणी पिंपळे गुरव येथील ४२ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप शर्मा आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने तो एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचे गॅस कनेक्शनचे बीपी नंबर अपडेट करण्यासाठी त्यांना काही रक्कम ऑनलाइन भरण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगत त्यावरून दोन लाख नऊ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या नावावर नऊ लाख ८७ हजार २० रुपयांचे पर्सनल लोन केले. त्यातील चार लाख ४९ हजार ९९९ रुपये असे एकूण सहा लाख ५८ हजार ९९९ रुपये घेत फसवणूक केली.

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात चऱ्होलीतील दाभाडे सरकार चौकात घडला. कृष्णपाल प्रतिपाल सिंह (वय ३३, रा. चौधरी पार्क, दिघी, मूळ- उत्तरप्रदेश) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी हरपाल प्रतिपाल सिंह यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक माउली शिवाजी पवार (वय ३२, रा. लोणीकंद, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हरपाल यांचे भाऊ कृष्णपाल हे दुचाकीवरून कामासाठी जात होते. दरम्यान, दाभाडे सरकार चौकात त्यांच्या दुचाकीला एका डंपरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कृष्णपाल यांच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मोशीत साडेसोळा लाखांचे दागिने लंपास
पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने घरातून १६ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना मोशी येथील केशर किंगस्टन्स सोसायटीत घडली. याप्रकरणी जगदीश महादेव तेलशिंगे (रा. केशर किंगस्टन्स, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. चोरटे उघड्या दरवाजावाटे फिर्यादी यांच्या घरात शिरले. त्यानंतर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १६ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

भरधाव टेम्पोच्या धडकेत दोघे जखमी
पिंपरी : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना वाकड येथे घडली. याप्रकरणी अर्जुन मनोज कुमार शुक्ला (वय २१, रा. आकुर्डी, मूळ - संगमनेर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक लखन देविदास जाधव (वय ३४, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, पुणे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र शंतनू सुहास रणखंबे हे सातारा-मुंबई रस्त्याने जात होते. दरम्यान, वाकड येथे भरधाव टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये दोघेही जखमी झाले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com