दापोडीत दोन गटामध्ये यांच्यात हाणामारी

दापोडीत दोन गटामध्ये यांच्यात हाणामारी
Published on

पिंपरी, ता. ११ : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दापोडी येथे घडली. यामध्ये दोन्ही गटातील आरोपींनी कोयते हवेत फिरवत परिसरातील नागरिकांना धमकी दिली. आरोपींपैकी एकाने आपण दापोडीचा डॉन तर एकाने दापोडीचा भाई असल्याचे म्हणत नागरिकांना धमकावले.

सलमान अकबर शेख (वय २६, रा. गुलाबनगर, दापोडी) याने दापोडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संजय राजू पातारे (वय २४, रा. दापोडी) याला अटक केली आहे. फिर्यादी हा काम संपल्यानंतर घरी जात असताना आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपीने कोयता हवेत फिरवून मदतीस येणाऱ्या लोकांना ‘खबरदार कोणी मध्ये आले तर, मी दापोडीचा डॉन आहे, डॉन झुकता नही झुकाता है,’ असे म्हणत लोकांना धमकावले. तर संजय राजू पातारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सलमान अकबर शेख ( वय २६), सत्यम गणेश जाधव (वय २०) या दोघांना अटक केली आहे. फिर्यादी कामावरून घरी जात असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. कोयता हवेत फिरवत ‘खबरदार कोणीमध्ये आले तर, मी दापोडीचा सलमान भाई आहे,’ असे म्हणत लोकांना धमकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com