

पिंपरी, ता. ११ ः दुचाकी व मोटार वाहन चाचणी केंद्र सध्या कासारवाडी येथील आयडीटीआर येथे सुरु आहे. चाचणीसाठी होणारा विलंब, पैशाची जादा आकारणी आणि आरटीओ कार्यालयापासून खूप अंतर असल्यामुळे हे चाचणी सेंटर मोशी येथील ट्रॅफिक पार्क येथे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनने केली आहे.
यासंदर्भात न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष बबन मिसाळ यांनी प्रसिद्धिपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून दिवसाकाठी तीनशे ते साडेतीनशे चाचण्या घेतल्या जातात. कासारवाडी येथील ‘आयडीटीआर’मध्ये चाचणी वेळेवर होत नाही. परवाना काढण्यासाठी वाहनचालकांकडून फी आकारली जाते. प्रत्यक्षात आरटीओला त्याचे शुल्क भरूनही पुन्हा वेगळे पैसे देण्याची गरज नाही. वाहन परवाना चाचणी तपासणी पूर्वीप्रमाणे मोशीत व्हावी, अशी मागणी त्यात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.