हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुकीत आज बदल

हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुकीत आज बदल
Published on

पिंपरी, ता. ११ : हिंजवडी येथील ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची यात्रा शनिवारी (ता. १२) आहे. या यात्रेत पारंपारिक बगाड मिरवणूक असून, त्यात सुमारे दीड ते दोन लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात्रा व बगाड़ मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी शनिवारी हिंजवडी व वाकड परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल शनिवारी (ता. १२) दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत असेल.

*असा असेल बदल
- टाटा टी चौक ते वाकड नाक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग- विप्रो सर्कल फेज ०२ चौकाकडून शिवाजी चौक मार्गे वाकडनाकाकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौक येथून लक्ष्मी चौक-भुमकर चौक मार्गे जाईल.
- जॉमेट्रीक सर्कल ते वाकडनाकाकडे वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग- जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून शिवाजी चौक मार्गे वाकड नाक्याकडे जाणारी वाहतूक ही मेझा-९ चौकातून डावीकडे वळून लक्ष्मी चौक भुमकर चौक मार्गे जाईल.
- शिवाजी चौक ते भुमकर चौक वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग-शिवाजी चौकाकडून कस्तुरी चौक मार्गे भूमकर चौकाकडे जाणारी वाहतूक इंडियन ऑइल चौक मार्गे जाईल.
- इंडियन ऑइल चौक ते विनोदे वस्ती चौकाकडे वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग- इंडियन ऑइल चौकाकडून कस्तुरीचौक मार्गे विनोदे वस्ती व हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक शिवाजी चौक व वाकडगाव मार्गे जाईल.
- इंडियन ऑईल चौक ते वाकडनाका, सयाजी अंडरपास मार्गावर वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग- इंडियन ऑइल चौक मार्गे वाकडनाका, सयाजी अंडरपासकडे जाणारी वाहतूक वाकड उड्डाणपुलावरून /वाकडगाव मार्गे जाईल.
- मुळा नदी पूल पंक्चर ते वाकड नाका (भुजबळ चौक) वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - मुळा नदी पूल पंक्चर येथून सेवा रस्त्याने वाकडगाव व हिंजवडीकडे जाणारी वाहतूक हायवेने जाईल.
- कस्पटे चौक ते वाकडगांव चौकाकडे प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - कस्पटे चौक ते वाकडगाव चौक येणारी वाहतूक कस्पटे चौक येथून उजवीकडे वळून जगताप डेअरी चौक मार्गे जाईल.
- मानकर चौक ते वाकडगांव चौकाकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - मानकर चौक येथून वाकडगांव चौकाकडे येणारी वाहतूक काळेवाडी फाट्याकडे जवून इच्छित स्थळी जाईल. तसेच कस्पटे वस्ती येथून वाकडगांवकडे जाणारी वाहतूक मानकर चौकातून डावीकडे कस्पटे चौक मार्गे जाईल.
- कस्पटे कॉर्नर ते वाकडगांव चौकाकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - कस्पटे कॉर्नर येथून वाकडगांव चौकाकडे जाणारी वाहतूक उजवीकडे वळून म्हातोबा चौक मार्गे पिंकसिटी रस्त्याने जाईल. तसेच म्हातोबा चौकाकडून कस्पटे कॉर्नरला येणारी वाहतूक मानकर कस्पटे चौकामार्गे जाईल.
- वाकडगांव चौकाकडून वाकड गावठाण व वाकड नाक्याकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक दत्तमंदिर रस्त्याने जाईल.
- जागवार शोरूम ते सयाजी अंडरपासकडे सेवा रस्त्याने वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग -जागवर शोरूम येथून सयाजी अंडरपासकडे सेवा रस्त्याने न जाता हायवे रोडने इच्छित स्थळी जाता येईल.
- मायकार शोरुमकडून सेवा रस्त्याने भूमकर चौकाकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - महामार्गाने मुंबईचे दिशेने इच्छितस्थळी जावे.
- भूमकर चौकातून कस्तुरी चौकाकडे व शिवाजी चौकाकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - भूमकर चौकातून डावीकडे वळून मायकार शोरूम येथून हायवेने जावे.
- विनोदे चौकाकडून कस्तुरी चौकाकडे वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग -विनोदे चौक येथून लक्ष्मी चौक मार्गे व भूमकर चौकमार्गे जावे.
- दत्तमंदिर रोड उत्कर्ष चौकाकडून वाकडगांव चौकाकडे वाहनांस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - उत्कर्ष चौकाकडून डावीकडे वळून जावे. तसेच म्हातोबा चौकाकडून येणारी वाहतूक उत्कर्ष चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जाईल.
- वाकड वाय जंक्शन येथून कस्पटे चौकाकडे येणाऱ्या वाहनास प्रवेश बंद : पर्यायी मार्ग - वाकड वाय जंक्शन येथून सरळ पुढे
काळेवाडी फाटा मार्गे जाता येईल.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com