तृतीयपंथीयांना सक्षम करण्याची गरज : नरळे

तृतीयपंथीयांना सक्षम करण्याची गरज : नरळे

Published on

पिंपरी, ता. १५ : ‘‘तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्रित कार्य करण्याची गरज आहे,’’ असे मत सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे उद्‍घाटन तानाजी नरळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी साधना बोर्डे, तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होते.
तृतीयपंथियांच्या आरोग्य, शिक्षण, सक्षमीकरण, आर्थिक मदत, सामाजिक योजना, मानसिक आरोग्य अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तानाजी नरळे यांनी प्रास्ताविक केले. पौर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन, तर आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

तृतीयपंथी संस्थांचा सन्मान
संस्था / कार्य
- मंगलमुखी किन्नर ट्रस्ट, पुणे / सामाजिक, प्रशासकीय व मानसिक सक्षमीकरण कार्य
- उडण ट्रस्ट, पिंपरी / आरोग्यविषयक कार्य
- सावली फाउंडेशन (डॉ. अमित मोहिते) / फूटपाथ शाळा व गरजू मुलांसाठी कार्य
- दिशा मानवीय बहुउद्देशीय संस्था / महिला व तृतीयपंथीय सक्षमीकरण
- नारी द वुमन / आरोग्य सेवा, सामाजिक योजना व व्यवसाय प्रशिक्षण
- मंथन फाउंडेशन / आरोग्य, शिक्षण व सामाजिक कार्य
- जे.एस.एस.डी.टी. / ट्रान्स महिलांसाठी हेल्थ प्रोजेक्ट
- वाय.डी.ए. सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट / प्रशिक्षण
- शिखंडी ढोल-ताशा पथक / भारतातील पहिले तृतीयपंथियांसाठी ढोल ताशा प्रशिक्षण व सांस्कृतिक केंद्र
- फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय)/ तृतीयपंथीय आरोग्य सेवा
- नवचेतना युवविकास संस्था / सामाजिक योजना
- रामा तृतीयपंथीय दक्षता सामाजिक संस्था / आरोग्य व समाजकार्य
- रिलीफ फाउंडेशन / महिलांसाठी आरोग्य कार्य

तृतीयपंथी व्यक्तींचा सन्मान
- पंकज बोकील (शिवन्या पाटील) / कलाकार - समाजसेवक
- रफिया शेख / मीस ट्रान्स इंटरनॅशनल मॉडेल
- मिलिंद लबडे (मिलन) / स्पोर्ट्स - स्काय ड्रायव्हिंग
- विवेक तिगोटे / प्राणी संगोपक
- सचिन वाघोडे / नृत्यदिग्दर्शक, समाजसेवक
- नितू सिंग / समाजसेवक
- संगीता तोबे / तृतीयपंथी समाजकार्य
- डॉ. रश्मी बापट/ आरोग्यविषयक कार्य
- मिलिंद पळसकर/ आरोग्य क्षेत्रात २० वर्षांपासून कार्यरत
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com