दृष्टी-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन

दृष्टी-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन

Published on

(डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी)
आकुर्डीस्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘दृष्टी-२०२५’चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा झाल्या. त्यामध्ये नृत्य, फॅशन शो, प्रतिभा शोध, प्रश्‍नमंजूषा, कँडी कार्निवल, मेहंदी, रांगोळी, सलाड सजावट, फ्लोरल फॅंटसी, फोटोग्राफी, कल्पनेचे रेखाचित्र, हस्तकला आणि ट्रेझर हंट आदी स्पर्धांचा समावेश होता. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव देशपांडे आणि उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी उपस्थित होत्या. सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. मुकेश मोहिते, प्रा. पल्लवी सोमठाणे, प्रा. अंजू कल्याणकर, डॉ. निकिता पारगे आणि विद्यार्थी प्रतिनिधी मारूफ शिकलगार, प्रतीक्षा पवार, फिरदोस पठाण, विनोद ठाकरे, रोहन हाडे, प्रणव महाकलीवार आणि ओम गुंजल यांनी संयोजन केले.

शैक्षणिक सामंजस्य करार
(डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ)
पिंपरीतील टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू) पिंपरी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आकुर्डी यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला. टेक्सास स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रणेश अस्वथ, फाईन आर्ट्स अँड कम्युनिकेशन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जॉन फ्लेमिंग, मॅककॉय कॉलेज ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता डॉ. संजय रामचंद्र, मॅककॉय कॉलेज ऑफ बिझनेसचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. शेठ फ्रे, विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बॅरेट ब्रायंट, डीपीयूचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्रकुलगुरू स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. जितेंद्र भवाळकर, डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोहन चितलांगे, देविका शेट्टी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत चव्हाण, विश्वस्त डॉ. जे. जी. पाटील, संचालक ललित प्रसाद, प्रा. अविनाश पवार, आनंद खांडेकर, लिब्रल आर्ट कॉलेजचे संचालक डॉ. नंदकिशोर कपोते उपस्थित होते. करारांतर्गत डीपीयूच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, उद्योजकता, डिझाईन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आदी विषयांवर इंटर्नशिप करता येणार आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com