अवैध, मद्यपी रिक्षाचालकांचा मुक्त संचार
पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड शहरातील काही रिक्षाचालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करत आहेत. यातील अनेक जण चालकाचा परवाना नसतानाही रिक्षाच्या व्यवसायात उतरले आहेत. काही चालक मद्यपान करुन रिक्षा चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अशा रिक्षा चालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा वचक उरला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओकडे ६ एप्रिलपर्यंत ४४ हजार १४२ रिक्षांची रिक्षांची नोंद झाली आहे. सहज सेवा मिळत असल्यामुळे नागरिक प्रसंगी जादा पैसे मोजून रिक्षाने प्रवास करतात. ऑनलाइन ॲप आधारित रिक्षा सेवा सुरू झाल्यानंतर प्रवास आणखी जलद झाला आहे. रिक्षाचालकांना वाहन चालविण्याचा परवाना आणि रिक्षा परमिट बंधनकारक आहे. पण, अनेक जण विनापरवाना रिक्षा चालवत असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळेस तर १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले रिक्षा चालवताना दिसतात.
नियमानुसार रिक्षाचालकांना गणवेश बंधनकारक आहे. पण, तशी स्थिती सहसा दिसून येत नाही. काही मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू आहे. रिक्षांची मुदत संपली असतानाही अनफिट रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस दुचाकीस्वार, चारचाकी चालक, आणि मालवाहतूक वाहनचालकांवर कारवाई करतात. पण, दुसऱ्या बाजूला विनापरवाना, अनफिट रिक्षा आणि कोणतेही नियमांचे पालन करत नसतानाही त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. या रिक्षांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
शहरातील रिक्षांची तपासणी करुन रिक्षा परमिट आणि वाहन परवाना (लाससन्स) नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी आणि आरटीओने कारवाई करावी.
- नितीन पवार, रिक्षा पंचायत
पिंपरीसह पुण्यात जुन्या रिक्षा धावत आहेत. यातील अनेक जण विनापरवाना रिक्षा चालवत आहेत. या रिक्षाचालकांचा वाहतूक पोलिसांनी आणि आरटीओने शोध घेऊन त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी.
- केशव क्षीरसारगर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना
शहरात रात्रीच्या वेळेस काही जण मद्यपान करुन रिक्षा चालवतात. काही रिक्षाचालक उद्धट वर्तन करतात. त्यामुळे प्रवासी महिलांना असुरक्षित वाटते. प्रशासनाने अशा रिक्षा चालकांवर कारवाई करवी.
- मनीषा काटे, प्रवाशी
वर्षनिहाय रिक्षांची नोंदणी
२०२१ - २,३९८
२०२२ - ३,५६५
२०२३ - ६,०८९
२०२४ - ६,२९४
२०२५ - २,०४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

