डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वव्यापी व्यक्तिमत्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वव्यापी व्यक्तिमत्व

Published on

पिंपरी, ता. १३ : ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान आहे. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ म्हणून देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. शिक्षण, कायदा, राजकारण, समाजकारण, अर्थ अशा विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. ‘सर्वव्यापी’ असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे,’’ असे मत महापालिका आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वातील ‘सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावरील चर्चासत्रात विचारवंतांनी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पानपाटील, विधिज्ञ ॲड. अंबादास बनसोडे सहभागी झाले होते.

डॉ. जाधव म्हणाले, ‘‘आापले संविधान भारतातील १४४ कोटी लोकांना एकत्र बांधण्याचे काम करते. भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान आहे.’’ ॲड. लोखंडे यांनी सांगितले की, ‘भारतीय संविधान हे कधीच बदलता येणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे आपले भविष्य सुखकर करणारे आहे.’ पवार म्हणाले, ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे.’’ बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात लढलेल्या विविध खटल्यांची माहिती दिली. पानपाटील म्हणाले, ‘‘भारताला महासत्ता बनवण्यासाठी पायाभरणी करण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले आहे.’’ छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com