बांधकाम व्यावसायिकाची ४४ लाखांची फसवणूक
पिंपरी : ग्राहकाकडून आलेले ४४ लाख ७२ हजार ८१९ रुपये परस्पर स्वतःच्या बँक खात्यावर घेत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार डुडुळगावातील वसुंधरा सोसायटीतील ग्रे स्टोन वेंचरच्या कार्यालयात घडला. जय विलास राऊत (वय २८, रा. ड्रीम मॅक्स सोसायटी, धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर धीरेंद्र ईश्वरलाल पटेल (रा. पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे) असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, याप्रकरणी त्यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी पटेल यांच्या कार्यालयात काम करीत होता. त्यावेळी आरोपीने ग्रे स्टोन वेंचरच्या नावाने येणारे ४४ लाख ७२ हजार ८१९ रुपये आपल्या वैयक्तिक बँक खात्यात घेतले. त्यांच्या बनावट पावत्या, खोटे इंडेक्स टू, डिमांड लेटर, नो ड्युस लेटर तसेच सदनिकेचे पझेशन, सदनिकेच्या चाव्या फिर्यादी यांच्या परस्पर फिर्यादी त्यांची परवानगी न घेता ग्राहकांना दिल्या. यामध्ये फिर्यादीची व खरेदीधारकांची फसवणूक केली.
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे घडली. पंकज बाळासाहेब साने (वय २५, रा. साने वस्ती, नेरे, ता. मुळशी, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील बाळासाहेब रामभाऊ साने (रा. साने वस्ती, नेरे, ता. मुळशी, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पंकज हे नेरे येथील ढमाले नगर येथील रस्त्याने दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पंकज यांचा मृत्यू झाला.
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील आजी-नातू जखमी
पिंपरी : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नातू व आजी गंभीर जखमी झाले. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे घडली. याप्रकरणी यशोधन हनुमंत दहिभाते (रा. कोथरूड) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनरचालक दिलीप कुमार दुबे (वय ३२, रा. नाव्हाशेवा, पनवेल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांची आजी हे दुचाकीवरून लवळे फाटा येथून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव कंटेनरने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी व त्यांच्या आजीला दोघांना गंभीर दुखापत झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

